जयपुर : वृत्तसंस्था – Female Yoga Teacher | राजस्थान (Rajasthan) ची राजधानी जयपुर (Jaipur) मध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका योगा टीचरवर (Female Yoga Teacher) आपला जोडीदार असलेल्या योगा टीचरचा प्रायव्हेट पार्ट (private part) कापल्याचा आरोप आहे. पीडित व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा (Crime) दाखल करून तपास सुरू केला आहे.
राजधानीच्या भांकरोटा पोलीस ठाण्यात एका तरूणाने एका महिलेविरूद्ध (Female Yoga Teacher) प्रायव्हेट पार्ट कापल्याचे प्रकरण नोंदवले आहे. तक्रारीमध्ये पीडित तरूणाने म्हटले आहे की, तो बीकानेरचा राहणारा आहे. मागील तीन वर्षापासून जयपुरमध्ये राहून शिक्षण आणि योगा शिकवण्याचे काम करत आहे. त्याची सोशल मीडियाद्वारे एक महिलेसोबत चांगली ओळख झाली. यानंतर दोघे एकमेकांच्या घरी येऊ-जाऊ लागले.
महिलासुद्धा व्यवसायाने योगा टीचर आहे. तक्रारीत योगा टीचरने (Female Yoga Teacher) म्हटले आहे की, तो 16 नोव्हेंबरला योगा क्लास घेऊन वैशाली नगर येथून आपल्या घरी कनक वृंदावन येथे जात होता. तेव्हा महिलने त्यास दूध आणि भाजी आणण्यास सांगितले. योगा टीचर तरूण सामान घेऊन गांधी पथ येथील महिलेच्या फ्लॅटमध्ये पोहचला जिथे योगा टीचर महिलेने जेवण बनवले आणि तरूणाने सुद्धा तिथेच जेवण केले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तरूणाने महिलेवर केला गंभीर आरोप
जेवल्यानंतर जेव्हा तरूण आपल्या घरी निघाला तेव्हा महिला सुद्धा तरूणासोबत त्याच्या घरी आली. आपल्या घरी पोहचताच तरूणाला चक्कर येऊ लागली. काही वेळात तो बेडवर झोपला. तेव्हा महिला सुद्धा तरूणाच्या घरीच होती.
रात्री दोन वाजताच्या जवळपास तरूणाचे डोळे उघडले तेव्हा त्याच्या प्रायव्हेट पार्टजवळ वेदना होत होत्या. कपडे फाटलेले होते आणि बेड आणि फरशीवर रक्तच रक्त पडले होते. जेव्हा तरुण जखमी आवस्थेत उठला तेव्हा महिला तिथे नव्हती.
तरूणाने मदतीसाठी आवाज दिला, परंतु रात्रीची वेळ असल्याने शेजारी-पाजारी कुणीही आले नाही. नंतर तरूणाने महिलेला फोन केला तेव्हा महिलेने रडत-रडत म्हटले की, आय अॅम सॉरी. तेव्हा तरूणाने महिलेला (Female Yoga Teacher) म्हटले की, मला हॉस्पिटलला घेऊन जा. थोड्या वेळाने ती आपली कार घेऊन आली आणि तरूणाला कारमध्ये टाकून एका खासगी हॉस्पिटलमध्ये गेली. येथून त्याला डॉक्टरांनी SMS हॉस्पिटलमध्ये रेफर केले. तरूणावर सध्या उपचार सुरू आहेत.
योगा टीचर असलेल्या या जखमी तरूणाने आरोप केला आहे की, मला जेवणातून एखादा नशेचा पदार्थ खाऊ घालून एखाद्या धारदार हत्याने तिने माझे लिंग कापले आहे.
Web Title : female yoga teacher yoga teacher cut private part of bikaner male colleague with blade said i am sorry at bhankrota marathi news