बहुजननामा ऑनलाईन टीम : महाराष्ट्रातील अकोला जिल्हयात शिक्षिका पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी, महिला शिक्षिका त्यांच्याकडून पायाला मसाज करून घेत असे. कोर्टाने आरोपी महिला शिक्षिकेला पुराव्यांच्या आधारावर पोक्सो कायद्यानुसार ५ वर्ष कैद आणि ३० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शीतल अवचार असे या महिला शिक्षकाचे नाव असून ती मलकापूरच्या मूक बधिर शाळेत सरकारी शिक्षिका होती.
शीतल अवचार मलकापूरच्या मूक-बधिर शाळेत विशेष शिक्षक म्हणून कार्यरत होती. मुलांना शाळेत शिकवण्याऐवजी ती त्यांच्याकडून मालिश करून घ्यायची. जेव्हा हे बर्याच वेळा घडले तेव्हा मुलांनी याबद्दल आपल्या कुटुंबियांना सांगितले. २०१३ साली आरोपी महिला शिक्षिकेविरुद्ध विद्यार्थ्यांनकडून मसाज करण्याच्या बाबतीत कुटूंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. कोर्टाने आरोपी शिक्षिकेला ६ वर्षानंतर शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा व्हिडिओही समोर आला आहे.
वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षिका खुर्चीवर बसलेली असून, पांढरा-खाकी रंगाचा गणवेश घातलेला एक विद्यार्थी जमिनीवर बसून शिक्षिकेच्या पायाची मालिश करीत आहे. मालिश दरम्यान, शिक्षक शीतल मध्येच विद्यार्थ्यांशी हसत आहे. यावेळी काही मुले तेथूनही जातात पण शीतलने मालिश करणे थांबवले नाही. महिला शिक्षकेचे हे कृत्य बर्याच दिवसांपासून सुरू होते. एके दिवशी जेव्हा ती एका विद्यार्थ्याकडून मालिश करीत होती, तेव्हा कोणीतरी तिचा व्हिडिओ बनविला. यानंतर हे प्रकरण समोर आले आहे.
Visit : bahujannama.com