सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाइन – चीनमध्ये कोरोना व्हायरस मुळे मृत्यूंच्या संख्येत वाढच होत आहे. केवळ चिनच नव्हे तर जगभरातील इतर देशांना देखील कोरोना व्हायरसचा धोका सतावत आहे. अशातच आता महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक धास्तावले आहेत. यामागचे कारण असे की, सिंधुगुर्गातील सावंतवाडीजवळील रेडी बंदरात एक चिनी जहाद दाखल झाल्याचे वृत्त पसरले आहे. या वृत्तामुळे कोकणात खळबळ उडाली आहे.
जहाजावरील व्यक्तींची खाजगी अधिकाऱ्यांकडून तपासणी
चिनी जहाज या भागात आल्यानंतर या जहाजावरील लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याच्या संशयावरून या जहाजावरील व्यक्तींची तपासणी करण्यात यावी अशी मागणी येथिल स्थानिक नागरिकांनी केली आहे. दरम्यान, एका खासगी वैद्यकीय अधिकाऱ्याकडून या जहाजावरील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. या तपासणीत जहाजावरील एकाही कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र ही तपासणी अंतिम नाही. यामुळेच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लोकांच्या
आमच्या आरोग्याशी खेळू नका …
सावंतवाडीजवळील रेडी बंदरात आलेल्या जहाजावर असलेल्या कर्मचाऱ्यांविषयी करोनाबाबत ग्रामस्थांना संशय आहे.त्यामुळे जोपर्यंत सक्षम व तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून “त्या” कर्मचाऱ्यांची तपासणी करून घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान जहाजावरील कर्मचाऱ्यांची तपासणी खाजगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून झाली असली तरी ती अंतिम नाही.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशा भावना स्थानिक व्यक्त करत आहेत.