बहुजननामा ऑनलाइन टीम – कुत्र्यावरून भांडण करणे बाप-लेकाच्या(father-son) जीवावर बेतल आहे. अमेरिकेतील ही घटना असून एक 60 वर्षीय वडील आणि 32 वर्षीय मुलामध्ये(father-son) कुत्र्यांवरून जीवघेणे भांडण झाले आणि एकमेकांवर गोळी झाडली. यात दोघांचाही मृत्यू झाला.
मेट्रोने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी Kevlin James Coker त्यांचा मुलगा Nicholas Coker च्या अलबामातील Wagersville येथील घरी गेले होते. त्यावेळी त्यांच्या परिवारात असलेल्या पिट बुल प्रजातीच्या दोन कुत्र्यापैकी एका कुत्र्याने मुलगा निकोलसच्या प्रेयसीच्या मुलावर हल्ला केला होता. त्यामुळे निकोलसने चिडून कुत्र्याला मारले होते. यावरून बाप- लेकात वाद झाला होता. त्यानंतर मुलगा हवेत शॉर्टगन रोखून होता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी आपली गन काढली आणि मुलावर गोळी झाडली. याचदरम्यान मुलानेही वडिलावर गोळी झाडली.यात दोघांचाही मृत्यू झाला.
तर निकोलसची प्रेयसी Ariel Anderson ने फेसबुकवर काही वेगळच लिहले आहे. तिने लिहिले की, निकला त्याच्या वडिलाने मारले आहे. त्यानंतर त्याने स्वत:वर गोळी झाडून घेतली. तिने सांगितल की, निक तिच्या मुलीला वाचवत होता. पण तपासात असे काहीच समोर येत नाही की, वडिलाने स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे.