नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हैदराबादमध्ये काही दिवसांपुर्वी महिला डॉक्टरचा बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आले. ही घटना ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणीच या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करण्यात आला. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल सरकार व पोलिसांचे अभिनंदन केले. ते म्हणताय की, आता मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. हैदराबाद घटनेबद्दल देशभरात संताप व्यक्त झाला होता. आरोपींना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
Father of the woman veterinarian on all 4 accused killed in police encounter: It has been 10 days to the day my daughter died. I express my gratitude towards the police & govt for this. My daughter's soul must be at peace now. #Telangana pic.twitter.com/aJgUDQO1po
— ANI (@ANI) December 6, 2019
आता मुलीच्या आत्म्यास शांती मिळेल
पोलिस चकमकीत ठार झालेल्या चार आरोपींबाबत पशुवैद्येचे वडील म्हणाले, “माझ्या मुलीच्या मृत्यूला दहा दिवस झाले आहेत. याबद्दल मी पोलिस व सरकारचे आभार मानतो. आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल. ‘
आरोपीची आई म्हणाली की, त्यांना पण पीडिते सारखे जाळून टाका
२७ नोव्हेंबर रोजी आरोपीने पीडितेला मदतीच्या बहाण्याने सुमसाम ठिकाणी नेले. जेथे त्यांनी तिच्यासोबत दुष्कर्म केले आणि त्यानंतर शरीरावर पेट्रोल फवारले व पेटवून दिले. संपूर्ण देश या घटनेने उकळत होता. दिल्लीतील निर्भया घटनेची आठवण करुन देऊन या घटनेच्या आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. आरोपींपैकी एक केशवुलूची आई म्हणाली की त्यांना पण पीडिते सारखे जाळून टाका.
Visit : bahujannama.com