बहुजननामा ऑनलाईन- आपली लाडकी लेक समलैंगिक असल्याच्या कारणास्तव वडिलांनी स्वतःच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना नवी दिल्लीत घडली आहे. गावठी कट्ट्याने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. या प्रकरामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या शाहदरा येथील विश्वास नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. मुलगी समलैंगिक असल्याचं समजल्यापासून वडिल तणावात होते. त्यांनी आत्महत्या करायच्या आधी या मुद्द्यावरून घरात खुप वाद झाला होता. या तणावात त्यांनी मंगळवारी (ता.१०) रात्री रागाच्या भरात स्वत:वर गोळी झाडली. गोळीचा आवाज होताच कुटुंबीय जागे झाले. त्यांनी तत्काळ वडिलांना रुग्णालयात नेलं. पण रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्यांचा झाला होता.
पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर मुलगी समलैंगिक आहे का याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच, पोलीस या प्रकरणाची तपास करण्यासाठी कुटुंबीय आणि शेजाऱ्यांचीही चौकशी करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.