पुणे : बहुजननामा ऑनलाइन – जन्मदात्या बापाने आपल्या तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन त्यांना प्रेयसीकडे सोपविल्याचा धक्कादायक प्रकार दौंडमध्ये उघडकीस आला आहे. दौंड पोलिसांनी लखनऊ येथून बाप व त्याच्या प्रेयसीला पकडून तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. तीन महिन्यांपूर्वी या मुलींचे अपहरण करण्यात आले होते.
रवी होले (वय ३२) आणि ज्योत्स्ना निकंबे (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी सांगितले की, रवी होले आणि ज्योत्स्ना निकंबे यांचे प्रेम संबंध आहेत. ज्योस्ना निकंबे या कर्जत येथील मेंटल हॉस्पिटल येथे कामाला आहे. ज्योस्ना ही नेहमी हॉस्पिटलच्या कामानिमित्त लखनऊला जातात. तीन महिन्यांपूर्वी रवी होले हा दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील घरी आला व त्याने आपल्या तीन मुलींना म्हणाला की आता तुम्हाला दुसऱ्या आईकडे न्यायचे आहे. त्यानंतर त्यांना तो पुण्यात घेऊन आला. त्याने ज्योस्ना निकंबे हिची भेट घालून दिली व आता हीच तुमची दुसरी आई असे सांगितले. त्यानंतर ते तिघींना घेऊन लखनऊला गेले़ तेथे ज्योस्ना हिने तेथे नातेवाईकांकडे या तिन्ही मुलींना ठेवले.
दरम्यान, या मुलींच्या आईने अल्पवयीन मुली हरविल्याची तक्रार दौंड पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी त्यांचा तपास सुरु केल्यावर त्या मुली लखनऊ येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दौंड पोलिसांचे एक पथक लखनऊ येथे गेले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक करुन दौंडला आणले. त्यानंतर या अल्पवयीन मुलींना त्यांच्या आईच्या हवाली करण्यात आले. दौंडमधून या तीन मुलींना ज्या कपड्यानिशी नेले होते. त्याच कपड्यावर त्या लखनऊमध्ये तीन महिने रहात होत्या.
Visit : bahujannama.com
- भिजवलेले बदाम नियमित सेवन केल्यास होतील ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे
- लग्न करण्याचेही ‘हे’ 5 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- वार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या
- नितळ आणि सुंदर त्वचेसाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय
- नेहमी ताजेतवाने, उत्साहित राहण्यासाठी ‘या’ 9 गोष्टींची काळजी घ्या
- निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, जाणून घ्या
- मिठ जास्त खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम, जाणून घ्या