Fastag Mandatory | 1 एप्रिल पासून टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य ! MSRDC चा मोठा निर्णय; कॅश, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर टोलचे डबल पैसे भरावे लागणार

मुंबई : Fastag Mandatory | १ एप्रिल पासून प्रत्येक टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक कारला फास्टटॅग लावणे अनिवार्य आहे. जर कॅश, कार्ड किंवा यूपीआयद्वारे टोल भरला तर टोलचे डबल पैसे भरावे लागणार आहेत. एमएसआरडीसीने याबाबत परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण विभागाने दिलेल्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

एमएसआरडी मुंबईतील पाच टोल प्लाझाला ऑपरेट करते. यामध्ये दहीसर टोल नाका, मुलुंड पश्चिम, मुलुंड पूर्व, ऐरोली आणि वाशी या टोल नाक्यांचा समावेश आहे. यामधून काही राज्य सरकारच्या बस किंवा शालेय बसला टोल भरण्यापासून सूट दिली जाणार आहे.

याचसोबत वांद्रा- वरळी सी लिंक, मुंबई- पुणे एक्सप्रेसवे, जुना मुंबई-पुणे हायवे, मुंबई नागपूर समुद्धी एक्सप्रेस वे, नागपूर इंटीग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, सोलापूर इंटीग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, छत्रपती संभाजीनगर इंटीग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, काटोल बायपास या सर्व टोल नाक्यांवर फास्टटॅग पद्धतीने टोल भरावा लागणार आहे.