शंकर नागरी सहकारी बँक शाखा भोकरचा बँकेत रक्कम नसताना दिला धनादेश
भोकर : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – नावलौकिक आडत व्यापाऱ्याकडून अनेक वेळा लूट मार सुरूच असते पण शेतकरी जाणार तरी कुठे बाजार समिती त्यांच्या कडे तीळ मात्र लक्ष देत नाही? असा आवाज आता जनतेतून होत आहे.भगवती ट्रेडिंग कंपनी कडे हरभरा विकण्यास नेला मोजमाप झाल्यानंतर त्या हरभरा ह्या मालाची किंमत जेवढी होईल त्या स्वरूपात त्यांनी शंकर नागरी सहकारी बँक शाखा भोकर च्या नामांकित बँकेचा चेक(धनादेश) त्या शेतकऱ्याचे नावे दिला त्या शेतकऱ्याने भगवती ट्रेडिंग कंपनी चे मालक आनंद श्रीधरराव कदम(लघळूदकर) यांनी आनंद चिठ्ठे या शेतकऱ्यास धनादेश क्रमांक ११९७१९ चा १ लाख ५१ हजार २०० रुपयांचा धनादेश रक्कम टाकून दिला होता.
तो चेक बँकेमध्ये टाकला असता त्यांना त्या धनादेशद्वारे पैसे मिळाले नाही त्यांनी फसवणूक झाल्यामुळे बँकेकडून लिखित स्वरूपाची कागदपत्रे घेऊन नामांकित नोटरी वकील गोविंदराव लामकाणीकर या वकील द्वारे त्या फसवणूक करणाऱ्याला व्यापाऱ्यास नोटीस पाठवली आहे.फसवणूक प्रकरणी वकिलाची नोटीस गेल्यावर त्या व्यापाऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची चर्चा भोकर शहरात सुरू आहे.वकिलाच्या नोटीस मध्ये असे नमूद केले की त्या शेतकऱ्यास पंधरा दिवसाच्या आता रक्कम धनादशाप्रमाणे अदा करावी अन्यथा फोजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असे त्यानी नोटिसात सांगितले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर यांनी शेतकऱ्याचे फसवणूक कुठल्याही आडत दुकानदारांकडून होणार नाही ह्यासाठी लक्ष देणे अत्यावश्यक आहे.