बहुजननामा ऑनलाइन टीम – 26 जानेवारीला दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आता दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार पसरवणाऱ्या(Farmers’ agitation)शेतकरी नेत्यांविरोधात लुकआउट नोटिस जारी केली आहे. लुकाउट नोसीट जारी केल्यानंतर या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून दिल्ली पोलिसांना देण्यात आले असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
Meeting the injured Delhi Police personnel. We are proud of their courage and bravery. https://t.co/7ooTwEf06x
— Amit Shah (@AmitShah) January 28, 2021
दिल्ली पोलिसांनी हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 37 जणांना जबाबदार धरले असून एफआयआरदेखील नोंदवला आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी 20 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना नोटिस पाठवली आहे. तसेच शेतकरी नेते योगेंद्र यादव, बलदेव सिंग सिरसा आणि राजेवाल यांना नोटिस दिली असून यांच्याकडून तीन दिवसांच्या आत उत्तर मागवले आहे. दिल्ली पोलिसांच्या टीमने गाजीपुर बॉर्डर येथे शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक शेतकरी नेत्यांना नोटिस दिली.
Passports of the farmer leaders against whom Delhi Police issued Lookout Notice, to be seized as a part of the process: Delhi Police https://t.co/kLyeYCBes3
— ANI (@ANI) January 28, 2021
अमित शहांनी जखमी पोलिसांची घेतली भेट
दिल्लीत 26 जानेवारी रोजी झालेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले. यामध्ये आंदोलकांनी दिल्ली पोलिसांवर हल्ला केला. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी आज (गुरुवार) जखमी पोलिसांची रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
Delhi: Union Home Minister Amit Shah meets Police personnel – injured in the violence during farmers' tractor rally on January 26th – at Sushruta Trauma Centre, Civil Lines. pic.twitter.com/6AL9ENuM09
— ANI (@ANI) January 28, 2021