बहुजननामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसची वाढते संक्रमण पाहता महाराष्ट्रातील शिर्डीचे साई मंदिर आज दुपारी ३ वाजेपासून भाविकांसाठी बंद ठेवले जाणार आहे. सरकारचा आदेश येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. पण साई मंदिरात रोजसारखी पूजा आणि आरती होत राहील, अशी माहिती श्री साईबाबा संस्थानने दिली आहे. याशिवाय देशभरात अनके प्रसिद्ध मंदिरे कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवली जाणार आहेत.
सिद्धिविनायक मंदिर
याशिवाय मुंबईमध्ये असलेले सिद्धिविनायक मंदिरही बंद केले गेले आहे. सिद्धिविनायक ट्रस्टने १६ मार्चला संध्याकाळी ७ वाजेपासून बंद करण्याचा निर्णय केला होता. पुढील निर्णयापर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कामाख्या देवी मंदिर
गुवाहाटीतील प्रख्यात कामाख्या देवी मंदिरात भाविकांना देण्यात येणार भोग स्थगित करण्यात आला आहे. गुवाहाटीच्या निलांचल पर्वतावर असलेल्या या मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या देखील ५०% कमी केली असून मंदिर प्रशासनाने भाविकांच्या थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था केली आहे. तसेच भाविकांना हँड सेनिटायझर्सही उपलब्ध करून देण्यात येत असून मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी परिसरात वैद्यकीय शिबिराची व्यवस्था केली आहे. तरीही लोकं मंदिरात येत आहेत. त्यामुळेच ट्रस्टने मंदिर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याअगोदर सिद्धिविनायक मंदिरात पुजाऱ्यांना मास्क घातलेले पाहिले आणि प्रवेश करण्याआधी भाविकांच्या हातावर सॅनिटायझर लावले जात होते.
दगड़ूशेठ हलवाई मंदिर
तर दुसरीकडे महाराष्ट्रात गणपतीचे आणखी एक प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई मंदिरही तत्काळ बंद करण्याचा निर्णय दिला गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण ३९ लोकं कोरोना व्हायरसने पॉजिटीव्ह सापडली आहेत.
महाकालेश्वर मंदिर
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकालेश्वर मंदिरही आज सकाळी भस्म आरतीनंतर कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बंद केले गेले आहे.
वैष्णो देवी
तसेच जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णो देवी श्राइन बोर्डाने मंगळावारी एक एडव्हायजरी जारी करत एनआरआय आणि परदेशी पर्यटकांच्या यात्रेवर २८ दिवसांची बंदी लावली आहे.