अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई भत्त्यावरील प्रतिबंध हटवला ! 24 % वाढीला दिली मंजूरी, जाणून घ्या सत्य

fake alert finance minister
December 2, 2020

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संदर्भाने दावा केला जात आहे की, त्यांनी महागाई भत्त्यावर (डीए) लावलेला प्रतिबंध मागे घेतला आहे. इतकेच नव्हे, अर्थमंत्र्यांनी यामध्ये 24 टक्के वाढीस सुद्धा मंजूरी दिली आहे. मॅसेजमध्ये एका मॉर्फ्ड छायाचित्रासुद्धा वापर केला आहे. सध्या केंद्र सरकारच्या नावाने लोक फसवणूक सुद्धा करत आहेत. हे लोक केंद्र सरकारच्या नावाने फेक न्यूज किंवा व्हिडिओ किंवा मॅसेज वायरल करतात. यानंतर लोकांना फसवूण त्यांचे आर्थिक नुकसान करतात. जाणून घेवूयात या बातमीची सत्यता काय आहे.

पीआयबीने सांगितले सत्य
पीआयबीने ट्विट केले आहे की, वायरल मॅसेज सांगण्यात आले आहे की, केंद्र सरकारने महंगाई भत्त्यावर लावलेला प्रतिबंध मागे घेतला आहे. सोबतच डीएमध्ये 24 टक्के वाढीला मंजूरी सुद्धा दिली आहे. वायरल मॅसेजमध्ये ही माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संदर्भाने देण्यात आली आहे. सोबत लिहिले आहे की, लाभार्थ्यांना वाढलेली रक्कम एरियर म्हणून दिली जाईल. यामध्ये अर्थमंत्र्यांचा मॉर्फ्ड फोटो सुद्धा लावण्यात आला आहे. पीआयबीने स्पष्ट केले की, ही माहिती पूर्णपणे बनावट आणि भ्रम पसरवणारी आहे. केंद्र सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.