नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहला भेट देऊन सीमेवर चीनशी सामना करणार्या सैनिकांचे मनोबल उंचावले आहे. त्यांनी गलवान खोर्यातल्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांशीही संवाद साधला. त्यासाठी ते लष्कराच्या लेहमधल्या रुग्णालयात गेले होते. पण पंतप्रधानांची ही भेट आणि संवाद असल्याच्या शंका काही जणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या.
पंतप्रधान मोदींचे हे जखमी सैनिकांशी संवाद साधतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्याबरोबर काहींनी त्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. मुन्नाभाई एमबीबीएस असा हॅशटॅगसुद्धा ट्रेण्ड होऊ लागला. मोदी येणार म्हणून कॉन्फरन्स रूमचे हॉस्पिटल करून फोटोची संधी साधली, अशी टीका झाली. मोदींचे टीकाकार मोदींनी फोटो ऑपॉर्चिनिटी आणि प्रसिद्धीसाठी हा देखावा केला, असा आरोप करू लागले. एकही डॉक्टर, परिचारिका किंवा रुग्णोपयोगी साहित्य नाही, असे कसे हॉस्पिटल असेल आणि या अशा सोयी-सुविधांमध्ये आपल्या शूर जवानांना उपचार दिले जातात का, अशा शंकाही उपस्थित केल्या गेल्या.
#IndianArmy clarification on status of facility at General Hospital, Leh.https://t.co/LmEOrk0Hyf pic.twitter.com/s1biqIVpN4
— ADG PI – INDIAN ARMY (@adgpi) July 4, 2020
शेवटी लष्कराकडूनच यावरचे स्पष्टीकरण देण्यात आले. लष्कराने एक निवेदन प्रसिद्ध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह दौर्यादरम्यान तिथल्या जनरल हॉस्पिटलला भेट दिली. त्याबद्दल अत्यंत घृणास्पद आणि तथ्यहीन आरोप केले गेले. आपल्या शूर जवानांना दिल्या जाणार्या उपचारांबद्दलही आरोप केले गेले, हे दुर्दैवी आहे. आपले लष्कर जवानांची पूर्ण काळजी घेते. सर्वोत्तम उपचार त्यांना मिळतील याची जबाबदारी घेते, असे म्हटले आहे.