नवी दिल्ली : वृत्तसंस्था- सर्वाधिक लोकप्रिय अॅप फेसबुक सतत आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. आत्तासुद्धा फेसबुकने एक अनोखे फीचर बाजारात आणले आहे. या फीचरच्या मदतीने फेसबुक यूजर्सची चेहऱ्यावरून ओळख पटणार आहे. म्हणजेच युजर्सना लवकरच चेहऱ्याने अकाऊंट व्हेरिफाय करता येणार आहे. युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटी ही आणखी मजबूत करण्यासाठी फेसबुक फेशिअल रिकग्निशन सिस्टम डेव्हलप करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाली आहे.
फेसबुकवर फेक अकाउंटचे अनेक प्रकार समोर आले आहे. ज्यामुळे सोशल क्राईमच्या घटनांना उधाण आले आहे. आतापर्यंत फेसबुक अशा समस्या या अल्गोरिदम फिल्टरिंग आणि मॅन्युअल पद्धतीने सोडवत होते. मात्र तरीही या गोष्टीला आळा घातला न आल्याने हे खास फीचर तयार केले जात आहे. या सिस्टमच्या मदतीने युजर्सचा चेहरा स्कॅन केला जाईल त्यानंतर ते अकाऊंट स्वत: चं आहे की नाही याबाबत माहिती मिळेल. फेसबुक फीचरवर रिसर्च करणाऱ्या वॉन्गने या फीचरची माहिती दिली आहे.
त्याचप्रमाणे फेसबुक युजर्ससाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे फेसबुकने एक नवीन लोगो लाँच केला आहे. फेसबुकच्या या नव्या लोगोमध्ये सर्व इंग्लिश अक्षरं ही कॅपिटलमध्ये दिसणार आहेत. मात्र हा बदललेला लोगो फेसबुक अॅप किंवा फेसबुक वेबवर दिसणार नाही. नवा लोगो GIF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आला असून तो मूव्हिंग आहे.
तसेच फेसबुक लवकरच आपल्या प्लॅटफॉर्मवर न्यूज सेक्शन ही नवीन सर्व्हिस सुरू करणार आहे. या सेक्शनच्या माध्यमातून जगभरातील सर्व बातम्या या युजर्सना पाहायला मिळणार आहेत. न्यूज सेक्शन या नव्या सर्व्हिससाठी फेसबुक न्यूज प्रोव्हाईड करणाऱ्या वेबसाईट आणि एजन्सीसोबत चर्चा करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फेसबुकने आपल्या प्लॅटफॉर्मवरून न्यूज सेक्शन सुरू करण्यासाठी प्रमुख मीडिया हाऊसशी चर्चा सुरू केली आहे. यामध्ये न्यूयॉर्क पोस्ट, वॉशिंग्टन पोस्ट, समाचार कॉर्प सारख्या मीडिया हाऊस आणि पब्लिकेशन्स आहेत.
Visit : bahujannama.com