पुणे : बहुजननामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रिपब्लिकन बहूजन विद्यार्थी परिषद शाखेचे उदघाटन गुरुवारी सांयकाळी करण्यात आले . रिपब्लिकन बहूजन विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यापीठामद्ये एम.फिल आणि पी. एचडी चे संशोधक विद्यार्थी विद्यावेतनासाठी आमरण उपोषण करत आहेत .त्यांच्याशी बोलताना विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे .
येथील कुलगुरू तसेच कर्मचारी हे विद्यार्थ्यामुळे आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे .येथील मनुवादी व्यवस्था बहुजन विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित करू पाहत असल्याचेहि ते बोलले मा.शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्याशी बोलून त्यावर तोडगा काढू असे मा. कांबळे म्हणाले विद्यार्थ्यांशी अनेक वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यात आली . या उपोषणाला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिपब्लिकन बहूजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
यावेळी RBVP चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर कांबळे मा. सचिन बनसोडे ( RBVP सचिव मुंबई ) मा. प्रशांत मोरे ,पिंपरी चिंचवड शहर युवक आघाडी मा. कुणाल व्हावळकर , RBVP पुणे शहराध्यक्ष मा. सुरज गायकवाड , RBVP पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कु.सुजित कांबळे, सुरज गजरमल RBVP (सा. फु पुणे विद्यापीठ शाखाध्यक्ष) सयाजी वाघमारे (उपाध्यक्ष )ललित नागरे (कार्यध्यक्ष)मारुती कोकणे (सरचिटणीस ),पल्ल्लवी भोसले (संघटक ) मयूर दामोदरे ,मयूर ताह्मणे ,शकील ,राहुल ,सोमा सोनावणे ,कृष्ण घोलप ,मयूर भांडे ,अमित सावंत तसेच इतर विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते .