बहुजननामा ऑनलाईन टीम – रात्रीच्यावेळी परिसरात गस्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचा-याचे एका सराफाच्या पत्नीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर ती महिला आपल्या पतीला रोज रात्री दूधातून झोपेच्या गोळ्या देऊन त्या पोलिसासोबत शय्यासोबत करत होती. असे बरेच दिवस सुरु होते. मात्र एके दिवशी सराफाला जाग आली अन् त्याने त्या दोघांना नको त्या स्थितीत रंगेहात पकडले. उत्तर प्रदेशच्या बरेलीच्या केंट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबधित पोलीसावर कारवाईचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बरेलीच्या केंट पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी या भागात रोज रात्री गस्त घालत होता. यावेळी सराफाची पत्नी अन् त्याची ओळख झाली. त्यातून प्रेमसंबध जुळले. त्यानंतर ते लैगिंक संबध ठेवू लागले. यासाठी पोलिसाच्या सांगण्यावरून पत्नीने सराफाला दुधातून झोपेच्या गोळ्या देत होती. पती झोपल्यानंतर त्याची पत्नी प्रियकर पोलीसाला फोन करून घरी बोलावून घेत असत. पोलीस देखील गस्त सोडून तिच्या घरी येऊन रात्र घालवत होता. असे बेरच दिवस दोघाचे सुरु होते. मात्र एका दिवशी सराफाचे पोट बिघडल्याने पत्नीने दिलेले दूध न पिता तसाच तो झोपी गेला. पत्नी नेहमीप्रमाणे नव-याने दूध पिले असे समजून प्रियकराला फोन केला. तो घरी आला अन् नेहमीप्रमाणे त्यांच्यात गुफ्तगु सुरु झाले. याचवेळी सराफाला जाग आली अन् त्याने दोघांना नको त्या स्थितीत रंगेहात पकडले. सराफाने दोघांचाही शरिरसंबंधाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे. त्यानंतर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला फोन करून रात्रीच बोलवून घेतले. त्याने पुरावा म्हणून तो व्हिडीओच पोलिस अधिकाऱ्याला दाखविला आणि शिपायाविरोधात गुन्हा दाखल करण्यास भाग पाडला आहे.