बीडः बहुजननामा ऑनलाईन – गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 50 हजाराची लाच स्विकारताना बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकाला एसीबीने सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे. एसीबीने बुधवारी (दि. 2) दुपारी ही कारवाई केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय लक्ष्मण दिंडकर (वय 40) असे अटक केलेल्या लाचखोर निरीक्षकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपी दिंडकर यांने तक्रारदाराविरोधात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तसेच गुन्ह्यातून कमी करण्यासाठी तक्रारदाराकडे 75 हजाराची लाच मागिती होती. पण तडजोडी अंती 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तर दुसरीकडे तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार एसीबीने बुधवारी दुपारी बीड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात सापळा रचून आरोपी दिंडकर याला 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.
औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, प्रभारी अप्पर पोलीस अधिक्षक मारुती पंडीत. पोलीस उपनिरीक्षक ब्रम्हदेव गावडे, याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विकास घनवट, पोलीस अंमलदार मिलींद इणर, रविद्र काळे, भूषण देसाई, चंद्रकांत शिंदे आदीनी ही कारवाई केली.
कृपया हे देखील वाचा:
कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या
उष्ण हवामानात काढा पिण्याने नुकसान होऊ शकते का? यासाठी 5 गोष्टी लक्षात ठेवा