मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Excise Duty | महाराष्ट्र सरकारने इम्पोर्टेड किंवा आयात केलेल्या स्कॉच व्हिस्की (imported Scotch whiskey) वरील उत्पादन शुल्क (Excise Duty) दरात 300 % वरून कमी करून 150 टक्के कपात केली आहे. यामुळे राज्यात तिचे दर इतर राज्यांच्या बरोबरीने झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकार्याने शुक्रवारी ही माहिती दिली. या अधिकार्याने म्हटले, स्कॉच व्हिस्कीवर उत्पादन शुल्क उत्पादन खर्चाच्या 300 वरून कमी करून 150 टक्के केले आहे (Imported liquor became cheaper in Maharashtra, government reduced excise duty by 150 per cent).
अधिकार्याने म्हटले की, याबाबत अधिसूचना गुरुवारी जारी केली जाईल. महाराष्ट्र सरकारला इम्पोर्टेड स्कॉचच्या विक्रीवर वार्षिक 100 कोटी रुपयांचा महसूल (Excise Duty) मिळतो. या कपातीने सरकारचा महसूल वाढून 250 कोटी रुपयांवर पोहचण्याची शक्यता आहे. कारण यामुळे स्कॉचची विक्री एक लाख बाटल्यांवरून वाढून 2.5 लाख बाटल्या होईल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बनावट दारूच्या विक्रीला ब्रेक
शुल्क कमी केल्याने इतर राज्यांतून स्कॉचची तस्करी आणि बनावट दारूच्या विकीला लगाम लागू शकतो. उत्पादन शुल्कात कपातीमुळे महाराष्ट्रात इम्पोर्टेड व्हिस्कीचे दर कमी झाले आहेत.
यामुळे राज्याला मिळणार्या महसूलात मिळणार्या महसूलात वाढ होईल. वृत्तानुसार आता 1 लाख बाटल्यांची विक्री एका दिवसात होते, शुल्क कमी झाल्याने बाटल्यांची विक्री अडीच लाखावर जाऊ शकते. सर्व राज्य सरकारांना दारूच्या विक्रीतून सर्वाधिक महसूल मिळतो. आता महाराष्ट्रातील लोकांना आयात केलेली स्कॉच मिळू शकते.
Web Title : Excise Duty | maharashtra government cuts excise duty on imported scotch by 150 percent marathi news bahujannama.
Katrina Kaif | विकी कौशलशी विवाह केल्यानंतर नाव बदलणार कतरिना कैफ, ‘ही’ असणार नवी ओळख
Sushmita Sen | सर्जरीनंतर आता ‘अशी’ दिसते अभिनेत्री सुष्मिता सेन, सोशल मीडियावर शेअर केला फोटो