गोंदिया : बहुजननामा ऑनलाईन – तेली समाजाच्या विकासाकरिता आदर्श तेली समाजसेवा समिती स्थापन करण्यात आली. शहरातील तेली समाजबांधवांची सभा भरत वाघमारे यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी भरत पाटील होते. सभेला उपस्थित समाजबांधवांनी समाजाच्या विकासाकरिता चर्चा केली. आदर्श तेली समाज सेवा समिती स्थापन करावी, समितीच्या माध्यमातून औपचारिक कार्यक्रम घेण्यात यावे, अशा विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर आदर्श तेली समाजसेवा समिती स्थापन करण्यात आली.
या वेळी विजय सुपारे, लिखनलाल गिऱ्हेपुंजे, कैलास भेलावे, टोपलाल ब्राम्हणकर, संतोष भेलावे, हरीश तुळसकर, चंदू चामट, गोपाल कापसे, सरसराम पिसे, संजय साठवणे, रवींद्र सोमनकर, मोरेश्वर भिवगडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या समितीचे अध्यक्ष म्हणून कलम हटवार यांनी निवड करण्यात आली. सचिवपदी हरीश तुळसकर, कार्याध्यक्ष भरत पाटील, कोषाध्यक्ष वसंत निखाडे, संपर्कप्रमुख संजय साठवणे, कार्यालयीन चिटणीस दिनेश गायधने तर प्रसिद्धीप्रमुख म्हणून राहुल मदनकर, सुनील भोंगाडे, टी. के. बावनकर यांचा समावेश करण्यात आला. सभेला मोतीराम देशमुख, भरत पाटील, दिलीप पाटील, दिनेश गायधने, आर.एच. घारपिंडे, बी. एफ. बालपांडे, मनोहर कापसे, हेमंत येरणे, सुभाष कापसे, प्रकाश आगळे, मनोज साकुरे, वसंत निखाडे, एस. यू. वंजारी, कमल हटवार, एस. पी. कुंभलवार, राजेश कापसे, संतोष वैद्य, रेखा मोटघरे, कु. पी.ओ. झिंगरे आदी उपस्थित होते.