नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे पेन्शनधार असाल तर तुमच्यासाठी एक नवीन सुविधा सुरु झाली आहे. या सुविधेअंतर्गत तुम्ही घरबसल्या लाईफ सर्टिफिकेट सबमिट करावे लागेल.
पेन्शनरला दरवर्षी लाइफ सर्टिफिकेटद्वारे जिवंत असल्याचा पुरावा द्यावा लागतो. यामुळेच पेंशनधारक ईपीएफओला जीवन प्रमाणपत्र सादर करतात. पहिले ही सुविधा फक्त ऑनलाईन होती. पण आता ईपीएफओने ऑनलाईन लाईफ सर्टिफिकेट सबमिट करण्याचा पर्याय दिला आहे.
ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, पेन्शनधारक आता त्यांच्या सोयीनुसार वर्षाच्या कोणत्याही वेळी जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन माध्यमाद्वारे सादर करू शकतात. हे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी वैध असून दरवर्षी ते सादर करणे बंधनकारक आहे.
देशभरातील सुमारे ६४ लाख लोकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत असून या लोकांना ईपीएफओच्या नवीन सुविधेचा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत आपण हे प्रमाणपत्र सबमिट न केल्यास आपली पेन्शन रोखली जाऊ शकते.