नवी दिल्ली (New Delhi) : EPFO | केंद्र सरकारने सोमवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) माध्यमातून वेतन अनुदान योजना (wage subsidy) नऊ महिन्यांसाठी वाढवली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Nirmala sitharaman) यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, आत्मनिर्भर भारत रोजगार योजना (Atmanirbhar bharat scheme) 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नवीन कर्मचार्यांची टेक-होम सॅलरी (Take home salary) वाढणार आहे.
याबाबत जाणून घेवूयात…
जाणून घ्या कसा मिळणार लाभ?
या स्कीमचा हेतू नवीन कर्मचार्यांना लाभ देणे आणि कंपनी, कर्मचार्यांना एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडमध्ये (Employee Provident Fund) योगदानासाठी मदत करणे आहे. ही योजना जी 30 जून 2021 पर्यंत नवीन नोंदणीसाठी समाप्त होणार होती, आता 31 मार्च 2022 पर्यंत सुरू राहील. 15,000 रुपये प्रति महिना कमाल वेतन असलेले सर्व कर्मचारी जे 1 ऑक्टोबर 2020 आणि 31 मार्चच्या दरम्यान सहभागी झाले होते किंवा सहभागी होत आहेत नोव्हेंबरमध्ये घोषित योजनेंतर्गत 2022 पर्यंत सरकारकडून ईपीएफ सबसिडी (EPF subsidy) मिळेल.
म्हणजे जो 12 टक्के PF तुमच्या पगारातून कापला जाणार आहे, तो सरकार स्वता देईल. नवीन कर्मचार्यांशिवाय केंद्राच्या या योजनेचा फायदा त्या कर्मचार्यांना सुद्धा मिळेल, ज्यांची नोकरी कोरोना व्हायरस महामारीमुळे 1 मार्च, 2020 नंतर गेली होती आणि आता त्यांना पुन्हा नोकरी मिळाली आहे.
जाणून घ्या काय आहे नियम?
या योजनेंतर्गत, भारत सरकारने 1 ऑक्टोबर 2020 च्यानंतर आणि 30 जून 2021 पर्यंत ठेवलेल्या
नवीन कर्मचार्यांच्या प्रकरणात दोन वर्षाची सबसिडी (subsidy) उपलब्ध करूण देण्याचा निर्णय
घेतला होता. आता योजनाचा लाभ 31 मार्च 2022 पर्यंत घेता येईल.
web title: EPFO | Now there will be an increase in the take-home salary of these employees, find out how you will get the benefit
Ashadha |तुम्हाला सुद्धा रहायचे आहे का निरोगी, मग आषाढ महिन्यात सूर्य उपासनेसह करा ‘हे’ काम
Ahmednagar News । अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी, कॉलेज युवतीवर महिनाभर अत्याचार
Delta Plus variant | कोरोना लसीचा डेल्टा प्लस मुळे प्रभाव कमी होतो हे सांगणे कठीण : डॉ. पॉल