नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रॉव्हिडंट फंड म्हणजे तुमच्या पगारातील एक प्रकारची बचत असते. पीएफमधून कमी पैसे कापले जावे, अशी इच्छा हातात पगार मिळवणारे करतात. तुम्ही तुमच्या पीएफचे योगादान कमी करण्यासाठी EPFO ने मोठे पाऊल उचलले आहे. वर्किंग वूमन, दिव्यांग तसेच २५-३० वर्ष कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना आपल्या पीएफमधील योगदान २ ते ३ टक्क्याने कमी करण्याची परवागनी मिळाली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पीएफमधील योगदान कमी करण्याचा निर्णय सर्वांना लागू नसून काही श्रेणींनाच त्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या श्रेणी काही निर्धारित मानांकाच्या आधारे केले जाईल, असेही ते म्हणाले.
यासंबंधी लवकरच निर्णय घेणार असून सरकारला याची कल्पना आहे की, रिटायरमेंटच्या वेळी सामाजिक सुरक्षेची आवश्यकता असते, असे ते म्हणाले. पण असे असले तरी तरुण कर्मचाऱ्यांसाठी सुरुवातीच्या दिवसात विवाह, घर खरेदी आणि करियरसाठी आणि इतर दुसऱ्या कारणांसाठी जास्त पैशांची आवश्यकता असते, त्यानुसार प्रस्तावावर विचार केला जात आहे.
पुढील परिस्थितीत तुम्ही पीएफमधील पैसे काढू शकता-
1. लग्न – तुम्ही तुमच्या मुला-मुलीसाठी, भाऊ-बहिणीसाठी किंवा स्वतःच्या लग्नासाठी तुमच्या पीएफ खात्यातील योगदानाच्या ५० टक्के हिस्सा काढू शकता.
2. शिक्षणासाठी – तुम्ही एखाद्या संस्थेत ७ वर्षे काम करत असाल तर उच्च शिक्षणासाठी ५० टक्के रक्कम व्याजासह काढू शकता.
3. घर आणि जमीन खरेदीसाठी – घर खरेदीसाठी तुम्ही नोकरी करून ५ वर्षे झाली असतील तर काही अटींसह पीएफमधून पैसे काढू शकणार आहेत. प्लॉट खरेदी करण्यासाठी मासिक वेतनाच्या २४ टक्क्यांपर्यंत आणि घर खरेदीसाठी मासिक वेतनाच्या ३६ टक्क्यांपर्यंत पीएफमधून काढू शकता.
4. वैदकीय आपात्का्लीन परिस्थिती – तुम्ही स्वतःच्या, मुलांच्या, पत्नीच्या किंवा आई-वडिलांच्या वैद्यकीय उपचारासाठी मासिक वेतनाचं ६ टक्के किंवा पीएफची पूर्ण रक्कम काढू शकता.
5. नोकरी गेल्यास – पहिल्या वर्षी EPFO ने आपल्या कर्मचाऱ्यांना एका महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरीवर न राहिल्यास पीएफ खात्यातील 75 टक्के रक्कमेचा हिस्सा काढण्यास परवानगी दिली होती. पीएफमधील बाकी 25 टक्के रक्कम नोकरी सोडण्याच्या 2 महिन्यानंतर काढता येईल.
Visit : bahujannama.com