EPFO | पीएफमधून 1 तासात तुमच्या बँक खात्यात येतील पैसे; जाणून घ्या अ‍ॅडव्हान्स घेण्याची पद्धत

EPFO | how to withdraw pf advance from epfo provident fund account step by step process

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ईपीएफओने (EPFO) सदस्यांना पीएफ व्याजाचे पैसे (Interest on PF Amount) ट्रान्सफर केले आहेत. तुम्हालाही घरी अडचण किंवा लग्नासाठी पीएफचे पैसे काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता. वैद्यकीय अडचणीसाठी पैसे काढल्यास, पैसे एका तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. त्याच वेळी, जर तुम्ही लग्नासाठी अ‍ॅडव्हान्स काढत असाल तर तीन दिवसांत तुमच्या बँक खात्यात पीएफचा अ‍ॅडव्हान्स येईल. पीएफ अ‍ॅडव्हान्स कसा काढायचा ते जाणून घेवूयात. (EPFO)

इतके आले व्याजाचे पैसे

विशेष म्हणजे 2020-21 या आर्थिक वर्षासाठी पीएफवर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावाला सरकारने यापूर्वीच हिरवा झेंडा दाखवला होता. या निर्णयाला कामगार मंत्रालयानेही संमती दिली होती. आता EPFO ग्राहकांच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. (EPFO)

अशा प्रकारे तुम्ही काढू शकता पीएफमधून अ‍ॅडव्हान्स पैसे

– www.epfindia.gov.in वेबसाइटच्या होम पेजवर, वरच्या उजव्या कोपर्‍यात ऑनलाइन अ‍ॅडव्हान्स क्लेमवर क्लिक करा.

– https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface

– ऑनलाइन सेवांवर जा क्लेम (फॉर्म-31,19,10C, 10D)

– बँक खाते क्रमांकाचे शेवटचे 4 अंक नोंदवा आणि सत्यापित करा

– Proceed for Online claim वर क्लिक करा

– ड्रॉप डाऊनमधून पीएफ अ‍ॅडव्हान्स निवडा (फॉर्म 31)

– तुमचे कारण निवडा. आवश्यक रक्कम नोंदवा आणि चेकची स्कॅन कॉपी अपलोड करा आणि तुमचा पत्ता नोंदवा.

– Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर प्राप्त झालेला OTP टाइप करा

– आता तुमचा क्लेम दाखल झाला आहे. पीएफ क्लेमचे पैसे तासाभरात तुमच्या खात्यात येतील.

Web Title :- EPFO | how to withdraw pf advance from epfo provident fund account step by step process

 

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल; म्हणाले – ‘राज्यात टोळीचे सरकार चाललंय काय ?’

Ajit Pawar | अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारीही शाळा सुरु ठेवा; अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन

Maharashtra Crime News | दहा दिवसापासून बेपत्ता असणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ

TET Exam Scam | TET घोटाळ्यात कारवाई ! पैसे भरून शिक्षक झालेल्या 7,800 जणांची यादी तयार; बोगस शिक्षकांवर कारवाईची शक्यता

Minimum Basic Salary-Pension | खुशखबर ! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वाढणार कर्मचार्‍यांची पेन्शन, जाणून घ्या किती होईल वाढ