नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच PF खातेधारकांच्या (PF Account Holders) खात्यात व्याजाचे पैसे ट्रान्सफर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नोकरदार सबस्क्रायबर्सच्या (Provident Fund) खात्यात या महिन्याच्या अखेरपर्यंत 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर (EPFO) केले जाईल. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 8.5 टक्के व्याज मिळेल. तुम्ही तुमच्या पीएफ खात्याचा बॅलन्स 4 पद्धतीने घरबसल्या चेक करू शकता. जाणून घेवूया कसा…
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
1. SMS द्वारे अशाप्रकारे चेक करा बॅलन्स
तुम्ही एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा. सोबतच तो अॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल. ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.
2. मिस्ड कॉलद्वारे चेक करा बॅलन्स
तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता. यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल. ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल. ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल
3. EPFO द्वारे चेक करा
तुम्ही ईपीएफओ वेबसाइटवर जाऊन सुद्धा बॅलन्स चेक करू शकता.
यासाठी ईपीएफओ पासबुक पोर्टलवर जा. यूएएन आणि पासबुकने लॉगइन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा
4. उमंग अॅपद्वारे (umang app)
प्ले स्टोर वरून उमंग अॅप डाऊनलोड करा. या अॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.
तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता
Web Title : EPFO | good news epfo will transfer pf interest soon in your account how to check balance know
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी