नवी दिल्ली :वृत्तसंस्था – EPFO | कोरोना संकटामुळे पीएफचे पैसे खात्यात येण्यास उशीर झाला आहे. आता सरकारने पीएफवर व्याजाचे पैसे जारी केले आहेत, परंतु ते खात्यात येणे बाकी आहेत. तुमचा पीएफ कापला (EPFO) जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
आता लवकरच कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) पीएफ खातधारकांना मोठी खुशखबर देऊ शकते. आता पीएफ खातेधारक अपेक्षा करत आहेत की त्यांना पीएफचे पैसे सप्टेंबर महिन्यात मिळतील.
ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, पीएफच्या व्याजाचे पैसे केव्हा येतील. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका खातेधारकाने EPFO ला टॅग करत प्रश्न विचारला होता की, ईपीएफओ व्याजाचे पैसे केव्हा ट्रान्सफर करेल.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
यावर ईपीएफओने अधिकृत ट्विटरवर उत्तर दिले की, जेव्हा व्याज खात्यात क्रेडिट केले जाईल, ते एकाचवेळी जमा केले जाईल आणि पूर्ण पैसे दिले जातील. कुणाचेही व्याजाबाबत नुकसान होणार नाही. मात्र, ईपीएफओने हे सांगितले नाही की, व्याजाचे पैसे कधीपर्यंत खात्यात ट्रान्सफर केले जातील.
– जाणून घ्या किती मिळेल व्याज
मोदी सरकारने फिस्कल ईयर 2020-21 साठी 8.5 टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार 6 कोटी पीएफ खातेधारकांच्या खात्यात 8.5 टक्केच्या दराने व्याज ट्रान्सफर केले जाईल.
web title: epfo epfo going be pf account holder know when big money will come account.
Pune Crime | भांडणात मध्यस्थी केल्याने सराईत गुन्हेगारासह चौघांकडून तरुणावर कोयत्याने वार
Home loan संबंधीत 11 गोष्टी ज्या जाणून घेणे आवश्यक, अन्यथा कॅन्सल होऊ शकते लोन अॅप्लिकेशन;