नवी दिल्ली : वृत्तसंस्था – EPFO Alert | पीएफ खातेधारकांसाठी (PF account holder) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अलर्ट (EPFO alert) जारी केला आहे. वैयक्तिक माहिती आणि अॅप डॉनलोड करण्याबाबत हा अॅलर्ट आहे. यामध्ये अकाऊंट होल्डर्सला कोणत्याही बनावट कॉलपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
ईपीएफओने (EPFO Alert) ट्विटमध्ये म्हटले आहे की, ईपीएफओ कधीही फोन कॉलवर खातेधारकांकडून यूएएन नंबर, आधार नंबर, पॅन नंबर किंवा बँक डिटेल मागत नाही.
कुणासोबत ही माहिती शेयर करू नका. आणि ईपीएफओ कुणाला फोनही करत नाही.
पीएफ खात्यात येऊ लागले पैसे
EPFO ने आर्थिक वर्ष 2020-21 चे व्याज क्रेडिट करणे, म्हणजे खात्यात टाकण्यास सुरूवात केली आहे. देशातील सुमारे 6.5 कोटी सबस्क्रायबर्सच्या खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, अजूनपर्यंत अनेक खातेधारकांना व्याजाचे पैसे मिळालेले नाहीत.
परंतु आशा आहे की लवकरात लवकर खात्यात (EPFO Alert) पैसे येतील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
जर आले नाही पैसे तर त्रस्त होऊ नका
कारण, व्याजाची रक्कम झोन वाईज के्रडिट होत असल्याने अनेकदा उशीर होतो.
तुम्ही सुद्धा तुमचा पीएफ बॅलन्स चेक करू शकता.
इतके आले आहेत व्याजाचे पैसे
सरकारने अगोदरच आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती.
कामगार मंत्रालयाने सुद्धा या निर्णयाला संमती दिली होती. आता ईपीएफओ सबस्क्रायबर्सच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे.
Web Title : EPFO Alert | pf money will disappear do not share this number even by mistake check details.