बहुजननामा ऑनलाइन टीम : काही दिवसांपुर्वी महिला डॉक्टरचा बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आले. ही घटना ज्या ठिकाणी झाली होती त्या ठिकाणीच या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांच्या या कृत्याचे राज्यात सगळीकडे समर्थन केल्याचे दिसत आहे. सर्व लोक पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत आहे.
सायबराबाद येथील टोलप्लाझाच्या जवळ एका महिलेचा जळालेला मृतदेह मिळाला. ही घटना २८ नोहेंबर रोजी घडली होती. ती महिला डॉक्टर होती. चौघांनी तिच्यावर बलात्कार करुन तिला जिवंत जाळण्यात आले. या चौघांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. मोहम्मद पाशा, नवीन, चिंताकुंता केशावुलु आणि शिवा अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यांच्या मुदतीचे फक्त दोन दिवस राहिले होते. शहरात बाहेर या घटनेचा खुप रोष दिसत होता. त्यामुळे पुरावा गोळा करण्यासाठी पोलीस आरोपींना दिवसा घटनास्थळावर घेऊन जाऊ शकत नव्हते.
त्यामुळे त्यांना हा प्रकार नेमका कसा केला, हे समजावून घेण्यासाठी जेव्हा ही घटना घडली होती. त्याचवेळी त्यांना तेथे पोलीस आरोपींना घेऊन गेले. त्यांनी या महिला डॉक्टरची गाडी कशा पंक्चर केली त्यानंतर तिला मदत करण्याच्या बहाण्याने ते कसे तिला बाजूला घेऊन गेले कोठे बलात्कार केला. त्यानंतर महामार्गावरील पुलाखाली तिला कशाप्रकारे पेटवून देऊन जाळले, हे पोलिस समजावून घेत होते. पहाटे तीन वाजता आरोपींपैकी एकाने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी पोलिसांनी या चार आरोपींवर गोळीबार करुन त्यांचा एन्काऊंटर केला.
Visit : bahujannama.com