नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाउन सुरू आहे. या संकटकाळात लोकांच्या नोकर्या जात आहेत व पगारात कपात केली जात आहे. तर अशा काही कंपन्या आहेत जिथे कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना बोनस दिला जात आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल), नेस्ले, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेज, सॅमसंग, व्हर्लपूल आणि एलजी यांच्यासह मोठ्या ग्राहक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांचे मनोधैर्य राखण्यासाठी त्यांना हाय-सिंगल-डिजिटमध्ये इन्क्रिमेंट व बोनस दिला जात आहे. हे इन्क्रिमेंट गेल्या १२ महिन्यांपासून म्हणजे मार्च ते एप्रिलसाठी आहे. या महामारीच्या आर्थिक दुष्परिणामांमुळे देशाकडे दुर्लक्ष होत असल्याने ते येत्या काही महिन्यांत चालू वर्षातील व्हेरिएबल पेआऊट व पगारवाढीचा आढावा घेतील, असे या कंपन्यांचे म्हणणे आहे.
HUL मध्ये काम करणाऱ्या लोकांना मिळाले इन्क्रिमेंट
देशातील सर्वात मोठी लिस्टेड ग्राहक वस्तू उत्पादक कंपनी एचयूएलने सांगितले की मागील वर्षाच्या व्हेरिएबलसह चालू वर्षासाठी इन्क्रिमेंट दिले गेले आहे. एचयूएल एप्रिल-मार्चच्या चक्राला फॉलो करत आहे. लक्स साबण आणि लिप्टन चहा बनवणाऱ्या या कंपनीत जवळपास १८,००० लोक काम करतात. मार्चच्या तिमाहीत त्याच्या विक्रीत ७ टक्क्यांनी घट झाली होती. त्याच्या पॅरेन्ट युनिलिव्हरने मार्चमध्ये म्हटले होते की ते आपल्या कर्मचार्यांना अनपेक्षित संकटांमुळे पेमेंटमधील होणाऱ्या अचानक कपातीपासून वाचवेल.
कोका-कोलाच्या कर्मचाऱ्यांना ७-८ टक्के इन्क्रिमेंट
बेव्हरेज मेकर कोका-कोलाचे स्वामित्व असलेली बॉटलिंग पार्टनर हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेज (एचसीसीबी) ने आपल्या ७,००० डायरेक्ट कर्मचार्यांसाठी ७-८% वेतनवाढ जाहीर केली आहे. एचसीसीबीच्या म्हणण्यानुसार चालू वर्षात या महामारीचा गंभीर परिणाम होईल, कारण लॉकडाऊनमुळे मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कंपनी अनिश्चिततेच्या काळात आपल्या कर्मचार्यांना साथ देणार आहे. कंपनीने या महामारीच्या अनिश्चिततेत सर्वात पहिले ठरवले कि कोणतीही वेतन कपात होणार नाही.
एनपी न्यूज24 नेटवर्क