नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Elon Musk | ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने एक खळबळजनक वृत्त दिले आहे. यात गुगलचे सह-संस्थापक सर्जी ब्रिन (Google Co-Founder Sergey Brin) यांची पत्नी निकोल शानाहानसोबत (Nicole Shanahan) टेस्लाचे सह-संस्थापक (Tesla Co-Founder) इलॉन मस्क (Elon Musk) यांचे प्रेमप्रकरण (Love Affair) सुरु असल्याचे म्हटले आहे. मात्र मस्क यांनी आपली बाजू मांडत हे वृत्त फेटाळले आहे. या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागल्याने ब्रिन यांनी त्यांच्या सल्लागारांना इलॉन मस्क यांच्या कंपन्यांमधील खासगी गुंतवणूक मागील काही महिन्यांत टप्प्याटप्प्यात काढून घेण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर मस्क यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
इलॉन मस्क आणि निकोल शानाहान यांच्या अफेयर संदर्भात आलेल्या एका वृत्ताच्या लिंकवर मस्क यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे की, हे वृत्त पूर्णपणे खोटे आहे. सर्जी आणि मी मित्र आहोत. काल रात्रीच आम्ही एकत्र एका पार्टीला होतो.
सर्जी यांच्या पत्नीला मी तीन वर्षात दोनदा भेटलो. मी निकोलसला मागील तीन वर्षांमध्ये केवळ दोनदाच पाहिले आहे.
दोन्ही वेळेस आमची भेट सार्वजनिक ठिकाणी झाली होती. यात रोमॅण्टीक असे काही नव्हते. (Elon Musk)
या प्रकरणाशी संबंधति लोकांचा संदर्भ देत ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात म्हटले आहे की,
टेस्ला कंपनीचे 51 वर्षीय सह-संस्थापक मस्क आणि निकोल शानाहान डिसेंबरच्या सुरुवातीला पहिल्यांदा संपर्कात आले.
या कथित प्रेमप्रकरणामुळे मस्क आणि ब्रिन यांची मैत्री संपुष्टात आली. 2008 साली मस्क यांची इलेक्ट्रीक कार कंपनी आर्थिक संकटात सापडली असताना ब्रेन यांनी मोठी मदत केली होती.
याचवर्षी जानेवारी महिन्यात 48 वर्षीय ब्रिन यांनी पत्नी निकोलपासून घटस्फोट घेतला होता.
मयामीमधील आर्ट बासीलमध्ये मस्क आणि ब्रिन यांची पत्नी निकोल यांच्यामध्ये प्रेमसंबंध जुळून आले.
ब्रिन यांची मस्क यांनी या प्रकरणावरून एका कार्यक्रमात माफी मागितली होती.
सध्या पोटगीवरून ब्रिन आणि निकोल यांच्यात वाद सुरु आहे. निकोलने पोटगी म्हणून 1 बिलीयन अमेरिकी डॉलर्स मागितले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून ब्लुमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स म्हणजेच श्रीमंतांच्या यादीत मस्क हे 242 बिलीयन अमेरिकी डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या स्थानी तर ब्रिन हे आठव्या स्थानी आहेत.
त्यांची एकूण संपत्ती ही 94.6 बिलीयन अमेरिकी डॉलर्स इतकी आहे.
मस्क यांचे खासगी आयुष्य वादग्रस्त राहिले आहे.
त्यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी न्यूरालिंकमधील वरिष्ठ महिला अधिकार्याला मस्क यांच्यापासून जुळी मुले झाल्याची माहिती या वर्षाच्या सुरुवातीला समोर आली होती.
इनसायडरच्या वृत्तानुसार, स्पेसएक्स कंपनीतील एका महिला कर्मचार्याने मस्क यांच्याविरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.
नंतर या प्रकरणात अडीच लाख अमेरिकन डॉलर्सची सेटलमेंट करण्यात आली.
परंतु यानंतर मस्क यांनी दावा केला की, ट्विटरसोबतच्या करारामध्ये अडथळे आणण्याच्या हेतूने हा आरोप करण्यात आला.
दरम्यान, मस्क यांनी ट्विटरसोबतच्या करारामधून माघार घेतली आहे.
Web Title :- Elon Musk | elon musk on reports he had affair with google co founder sergey brins wife nicole shanahan
हे देखील वाचा :
Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 3 पिस्टल जप्त
Diabetes च्या रूग्णांनी शरीराच्या या भागातील जखमेकडे करू नये दुर्लक्ष, ताबडतोब करावा उपाय