पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Electronica Finance Limited Pune | इलेक्ट्राॅनिका फायनान्स लिमिटेडच्या (ईएफएल) लोणीकंद येथील नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील सूक्ष्म, लघु व मध्यम (MSME) उद्योगांसाठी सर्वात विश्वसनीय वित्तीय संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईएफएल या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका शिल्पा पोफळे यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. ग्राहकांना सर्वोच्च दर्जाचा अनुभव देण्यासाठी या शाखेतील कर्मचारी कार्यरत आहेत. (Electronica Finance Limited Pune)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पारदर्शकता, नावीन्यता आणि ग्राहक केंद्रित धोरणाला अनुसरून ईएफएलतर्फे एमएसएमई उद्योगांना मशीन फायनान्स, रूफटाॅप सोलर फायनान्स आणि प्राॅपर्टी लोन अशा विविध सेवा पुरविण्यात येतात. ३० वर्षांहून अधिक वारसा लाभलेली ईएफएल ही एमएसएमई क्षेत्रातील मशीन फायनॅन्स, सोलर रूफटाॅप फायनॅन्स आणि लोन अगेन्स्ट प्राॅपर्टी (एलएपी) या क्षेत्रातील अग्रगण्य वित्तीय संस्था आहे. विनातारण कर्ज, जलद प्रक्रिया, आकर्षक व्याजदर, ग्राहकांचे सर्वांगीण मूल्यांकन आणि कार्यालयापर्यंतची थेट सेवा यामुळे ईएफएलची विश्वासार्हता सर्वाधिक असून २५ हजाराहून अधिक ग्राहक या सेवेचा लाभ घेत आहेत. (Electronica Finance Limited Pune)
शिल्पा पोफळे, व्यवस्थापकीय संचालक, इलेक्ट्राॅनिका फायनान्स लिमिटेड म्हणाल्या,
“ईएफएलसाठी पुणे शहर व जिल्ह्याची बाजारपेठ ही मोठी संधी आहे.
वर्षानुवर्षे ग्राहकांनी आमच्यावर व्यक्त केलेला विश्वास आणि सेवा पुरविण्यासाठी दिलेली संधी याबद्दल आम्ही
त्यांचे ऋणी आहोत. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने लोणीकंद परिसरात गेल्या काही वर्षात मोठ्या घडामोडी
घडल्या आहेत. वाघोली, शिरूर, शिक्रापूर यासारख्या भागांशी असलेल्या भौगोलिक जवळिकीनेही लोणीकंदच्या
विकासाला हातभार लावला आहे. पुण्यासारख्या विस्तारणाऱ्या शहरात आम्ही कायम आमच्या ग्राहकांच्या जवळ
राहण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत. लोणीकंद शाखेमुळे त्या भागातील ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. शाखेपासून ८० किलोमीटर परिसरातील ग्राहकांना या शाखेकडून लाभ मिळणार आहे. आपल्या व्यवसायाकरिता वित्तीय साहाय्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या जुन्या तसेच नव्या ग्राहकांना तत्पर व सर्वोच्च दर्जाची सेवा देण्यास नव्या शाखेतील कर्मचारी उत्सुक आहेत.”
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रदीर्घ अनुभव, देशभरात पसरलेले १६० शाखांचे जाळे आणि २८०० कोटींहून अधिक संख्येने असलेले अॅसेट अंडर मॅनेजमेंट यामुळे ईएफएलचा हा प्रवास आणि प्रगती अशाचप्रकारे अखंडित सुरू आहे.
नव्या शाखेचा पत्ताः
इलेक्ट्राॅनिका फायनान्स लिमिटेड, तळमजला, एपी पिनॅकल, सी-विंग, लोणीकंद-आळंदी फाटा, पुणे-अहमदनगर रस्ता, पुणे – ४१२२१६
संकेतस्थळः https://www.efl.co.in/
Web Title :- Electronica Finance Limited Pune | Inauguration of Lonikand branch of Electronica Finance Limited (EFL); Through the new branch, the industries and businesses in the area will be empowered
हे देखील वाचा :