Election | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती

Election | maharashtra zilla parishad and panchayat samitie election postponed

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन Election | राज्य शासनाने (State Government) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम (Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Act) 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक (Election) प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून (State Election Commission) शुक्रवारी (दि. 5) स्थगित केली. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये केलेल्या बदलासंदर्भातील अध्यादेश 4 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सदस्य पदांच्या जागांच्या संख्येत बदल करण्यात आला आहे.

 

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

सध्याची मतदार विभाग (Voter Division) आणि निर्वाचक गणांची रचना आणि आरक्षणाची (Reservation) प्रक्रिया देखील स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे सध्या सुरु असलेली निवडणूक (Election) प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. सध्या 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना शुक्रवारी (दि. 5) प्रसिद्ध करण्यात येणार होती.

 

याशिवाय 13 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी, तर 12 जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारुप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली आहे.

 

 

‘या’ जिल्ह्यातील निवडणूक स्थगित

याबाबत राज्य निवडणूक आयोग लवकरच संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आदेश देणार आहे.
यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद,
जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

 

Join our Whatsapp GroupTelegram, and  facebook page  for every update

 

 

Web Title :- Election | maharashtra zilla parishad and panchayat samitie election postponed

 

हे देखील वाचा :

Shashikant Shinde | ‘…म्हणूनच भाजपने मुख्यमंत्रिपद घेतलं नसेल, ते ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत’, शशिकांत शिदेंनी सांगितलं ‘प्लॅनिंग’

Pune Crime | ‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या विरोधात कोण बोलतो’ असे म्हणत टोळक्याचा राडा, कोयत्याने तरुणावर वार

Pune Crime | बालेवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त