बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ साठी निवडणूक आयोगाची टीम निवडणुकांच्या तयारीची पाहणी करण्यासाठी मंगळवारी (ता.१७) महाराष्ट्रात येणार आहे. या पथकात मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 अतिरिक्त निवडणूक आयुक्त असतील. निवडणूक आयोगाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारा सप्टेंबर रोजी महाराष्ट्र आणि हरियाणा येथे निवडणूक आयोगाने निवडणुकांसाठी महत्वाची बैठक बोलविली होती.
या बैठकीत आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक आयोगाच्या पथकाने मतदार यादी आणि निवडणुकीच्या इतर प्रशासकीय तयारीविषयी चर्चा केली. निवडणूक आयोगाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेचे काउंटडाउन सुरू झाले आहे. मागील निवडणूकांच्या तारखांची घोषणाही १२ सप्टेंबर रोजीच जाहीर झाल्या होत्या.
मात्र झारखंड विधानसभा निवडणुका महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत होणार नाहीत. तथापि, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा मधील विधानसभा निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी (ता.१२) दोन्ही राज्यांत विधानसभा निवडणुका घेण्यासाठी महत्त्वपूर्ण व अंतिम बैठक घेतली आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसर्या आणि तिसर्या आठवड्यात निवडणुका होणार आहेत. हरियाणात एका टप्प्यात निवडणुका अपेक्षित आहेत, तर महाराष्ट्रात २ ते ३ टप्प्यात मतदान होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.