मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– शिवसेनेच्या बंडखोर गटाचे (Shivsena Rebel MLA) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुरुवारी (दि.30) रोजी मुंबईत परतल्यानंतर शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला (Balasaheb Thackeray Memorial) भेट देणार असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. बंडखोर आमदार उद्या सकाळी मुंबईत दाखल होणार असून त्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांचे समर्थक आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
महाराष्ट्रातील जनतेला सुख समाधान आणि समृद्धीचे दिवस येवोत यासाठी आम्ही कामाख्या (Kamakhya Devi) देवीकडे मागणं मागितलं आहे. कामाख्या देवीचे दर्शन हे श्रद्धेचा विषय आहे. आपलं मागणं घेऊन सर्वच जण कामाख्या देवीकडे येतात आणि देवी त्यांना आशीर्वाद देते, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दर्शनानंतर म्हटले.
आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला कोणी रोखू शकत नाही.
कोणत्याही आमदारांवर जबरदस्ती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तसेच आम्ही उद्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आणि आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या शक्तीस्थळावर जाणार आहे,
अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. गुवाहाटी मधील कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.