शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या ज्या काही दोन बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. आमचे गटनेते आणि अजय चौधरी आणि सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी त्यांना नोटीस दिली होती. मात्र, बैठकीला आले नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस दिली. काही जणांनी नोटिसीला उत्तर दिलं. त्यामध्ये खरी खोटी कारणं दिली आहेत. म्हणून हे सगळं नजरेस आणणं आणि संविधानानुसार या संदर्भात जो शिस्तभंग आहे. त्याबाबत कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना पत्र दिलं. 12 आमदारांची नावे दिली. 12 पिटिशन सादर केले आहेत. यात त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली असल्याची माहिती अरविंद सावंत यांनी दिली.
कुणाची होणार आमदारकी रद्द?
1. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
2. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
3. संदीपान भुमरे (Sandipan Bhumre)
4. संजय शिरसाठ (Sanjay Shirsath)
5. अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
6. भरत गोगावले (Bharat Gogavale)
7. प्रकाश सुर्वे (Prakash Survey)
8. अनिल बाबर (Anil Babar)
9. बालाजी किनीकर (Balaji Kinikar)
10. यामिनी जाधव (Yamini Jadhav)
11. लता सोनवणे (Lata Sonawane)
12. महेश शिंदे (Mahesh Shinde)
Web Title :- Eknath Shinde | shivsena demands suspension of 12 rebel mlas from shinde group letter to assembly vice president narhari zirwal