मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Eknath Shinde | शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. सत्तानाट्याला आता चांगलाच वेग आल्याचे दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी एक नवं ट्विट जारी केलं आहे, त्या ट्विटमुळे आता राज्यातील नव्या चर्चेला तोंड फूटलं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोदपदी शिवसेना आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogavale) यांची नियुक्ती करण्यात आलीय. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं शिंदे यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,
“शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री. भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सबब, श्री. सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.” असं ते म्हणाले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Eknath Shinde | Appointment of Bharat Gogavale as the Chief Representative of Shiv Sena Legislature Information given by Eknath Shinde
हे देखील वाचा :
Uddhav Thackeray | ‘…तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन’ – CM उद्धव ठाकरे