बहुजननामा ऑनलाईन – जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त अमेरिकी बनावटीचे आठ अपाचे हेलिकॉप्टर भारतीय वायु सेवेत दाखल झाले. पठाणकोट वायु तळावर मंगळवारी (ता.३) वायुदलाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत हेलिकॉप्टर वायुदलाच्या सेवेसाठी दाखल करण्यात आले. भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस धनोआ यांच्या उपस्थितीत पठाणकोट वायुतळावर हे हेलिकॉप्टर हवाई दलात सामील करतील. भारत आणि अमेरिकेत 2015 मध्ये याबाबत करार झाला असून अशी एकूण 22 चॉपर्स भारताला मिळणार आहेत. याला ‘मल्टी रोल कोंबट हेलिकॉप्टर’ असंही म्हणतात.
या श्रेणीतलं हे जगातलं सर्वात अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे. अमेरिकन लष्कर आणि वायुदलातही याचा वापर केला जातो. जगातील सर्वात धोकादायक हल्ल्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये अमेरिकेच्या अपाचे हेलिकॉप्टरचे नाव सर्वात आधी घेतल जात. भारतीय वायुदलात हे हेलिकॉप्टर दाखल झाल्याने आता भारतीय वायुदलाची शक्तीही वाढणार आहे. हे हेलिकॉप्टर तीन दशकांहून अधिक काळातील MI 35 या हेलिकॉप्टरची जागा घेणार आहे. बी. एस धनोआ यांच्या निवृत्तीनंतर पहिल्या अपाचे स्क्वॉडर्न ग्रुप कॅप्टन एम. शयलू असणार आहेत. यापूर्वी ते कार निकोबार येथील MI-17 V5 हेलिकॉप्टर युनिटचे कमांडिंग ऑफिसर होते. ज्यांनी अपाचे हेलिकॉप्टरवर सखोल प्रशिक्षण घेतलं आहे.
वायुसेवेत दाखल झालेल्या या आठ अपामध्ये काही खास वैशिष्टये आहेत. यात शक्तीशाली शस्त्रे असतात. टू सीटर अपाचे अॅटॅक हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर क्षेपणास्त्र आणि प्रत्येक बाजूला दोन 30 मिमी बंदुका आहेत. हे हेलिकॉप्टर रात्रीच्या वेळीदेखील आपलं काम चांगल्या प्रकारे करू शकतं. या हेलिकॉप्टरसमोर एक सेन्सर बसवण्यात आला आहे. जो रात्रीच्या वेळी शत्रुचा अचूक वेध घेण्यास मदत करेल. आठ अपाचे हेलिकॉप्टर प्रति तास 365 किमी वेगाने उड्डाण करू शकणार हेलिकॉप्टर आहे. यात इतर हल्ल्याच्या हेलिकॉप्टर पेक्षा काही विशेष तंत्रज्ञानही विकसित करण्यत आले आहे. यातील हेल्मेट माउंटेड डिस्प्ले सर्वात महत्वाचा असून त्याच्या मदतीने हेलिकॉप्टरमधला पायलट सहजपणे शत्रूला लक्ष्य बनवू शकतो.
President Boeing India, Salil Gupte: These are the first 8 of the 22 Apache helicopters that are coming to India Air Force. These are the AH-64E variant, the same variant used by the US Army. These Apache helicopters have the latest technology. #PathankotAirbase pic.twitter.com/KWX6Chw4AI
— ANI (@ANI) September 3, 2019