नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरसचा परिणाम आता भारतावरही दिसू लागला आहे. गेल्या एका महिन्यात अंडी आणि कोंबडीच्या किमतींमध्ये 30 टक्क्यांनी घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचे काही मेसेज सोशल मीडियावर सातत्याने शेअर केले जात आहेत. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर कोरोना व्हायरसविषयी विविध संदेशांद्वारे लोकांना धमकावले जात आहे. यामुळे देशात अंडी आणि कोंबडीची मागणी कमी झाली आहे, त्यामुळे किंमतीमध्येही घट झालेली दिसत आहे.
स्वस्त अंडी आणि चिकन
राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या (NEC) आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभराच्या तुलनेत अंड्याचे दर 15 टक्क्यांनी कमी झाले आहेत. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीच्या (एनईसीसी) आकडेवारीनुसार, अहमदाबादमध्ये अंड्यांचे दर फेब्रुवारी 2019 च्या तुलनेत 14 टक्क्यांनी कमी झाले आहेत, तर मुंबईत ते 13 टक्के, चेन्नईमध्ये 12 टक्के आणि वारंगल (आंध्र प्रदेश) मध्ये 16 टक्के आहेत. दिल्लीत अंड्यांचे दर 358 रुपये झाले आहेत, तर गेल्या वर्षी ते 441 रुपये होते. यावर्षी जानेवारीच्या तिसर्या आठवड्यात दिल्लीत ब्रॉयलर कोंबडीचे दर 86 ते 78 रुपये प्रति किलोवर घसरले आहे. तसेच अन्य शहरांमध्येही कोंबडीचे दर खाली आले आहेत. पोल्ट्री आणि अंडी यांची मागणी सामान्यत: हिवाळ्यातील महिन्यांत दिसून येते.
मिळालेल्या माहितीनुसार, घाऊक बाजारात कोंबडीची अंडी आणि यांची किंमत 15-30 टक्क्यांनी घसरली आहे. पोल्ट्री फार्मशी संबंधित व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना सध्या दुटप्पी फटका बसत आहे. कोंबड्यांना आहार देणे महाग झाले आहे. मागील हिवाळी हंगामाच्या तुलनेत कोंबड्यांच्या चाऱ्याच्या किंमती 35-45 टक्क्यांनी जास्त आहेत. यामुळे पोल्ट्री व्यवसायाची किंमत वाढली आहे. त्याचबरोबर, कोंबडी आणि अड्यांच्या मागणीची घसरण शेतकर्यांसाठी एक समस्या निर्माण करत आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक घाबरले आहे. यामुळे देशात अंडी आणि कोंबडीची मागणी कमी झाली आहे.