मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ED Summon To Anil Parab | एकीकडे विधान परिषदेची रणधुमाळी असतानाच दुसरीकडे शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीकडून (ED) पुन्हा एकदा समन्स जारी करण्यात आला आहे. उद्या (मंगळवारी) चौकशीसाठी ईडीने बोलावले आहे. दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) ईडीने (ED Summon To Anil Parab) हा समन्स पाठवला आहे.
सक्तवसुली संचालनालयाकडून अनिल परब यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचबरोबर अनिल परब यांना 15 जून रोजी चौकशीसाठी बोलावले होते. पण परब शिर्डीला असल्याने ते पोहचले नव्हते. अनिल परब यांच्या दोन निवासस्थानांसह सुमारे 7 ठिकाणी ईडीकडून छापेमारी (Raid) करण्यात आली होती.
दरम्यान, कोस्टल रेग्युलेटरी झोन (Coastal Regulatory Zone-CRZ) नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आलेल्या रिसॉर्टच्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यामुळे आता ईडीने पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स जारी केलं आहे.
Web Title :- ed summon to anil parab for Sai Resort Case
हे देखील वाचा :-
Maharashtra Monsoon Update | राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा जोर; मुंबईसह कोकणाला ऑरेंज अलर्ट – IMD