ED Raid on Anil Parab | अनिल परब यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे आणखी काही दिग्गज नेते ईडीच्या रडारवर ?
मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ED Raid on Anil Parab | शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने Directorate of Enforcement (ED) छापेमारी (Raid) केली आहे. परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयांसह मुंबई (Mumbai), पुणे (Pune) आणि रत्नागिरीमध्ये (Ratnagiri) सात ठिकाणी छापेमारी दरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ईडीकडून अधिक तपास सुरू करण्यात येत आहे. यावेळी काही महत्वाचे पुरावे हाती लागले असून परब यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे (Shivsena) आणखीन काही नेते ईडीच्या रडारवर असण्याची शक्यता आहे.
ईडीने सध्या अनिल परब (ED Raid on Anil Parab) यांच्या संबंधित मालमत्तेबाबत तपास सुरू केला आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या आणखीन काही नेत्यांनाही ईडीच्या चौकशीला तोंड द्यावे लागणार असल्याची माहिती ईडी सूत्राने दिली आहे. दोन दिवसांपुर्वी परब यांचे निकटवर्तीय संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे.
संजय कदम आणि परब असोसिएटवरील प्राप्तिकर विभागाच्या (Income Tax Department) छापेमारीत, दापोली येथे एका राजकीय नेत्याने 2017 साली जमीन खरेदी केली. एक कोटीच्या मोबदल्यात ही जमीन देण्यात आली होती. नंतर याच ठिकाणी आलिशान रिसॉर्ट उभे राहिले. राजकीय नेत्याच्या नावे खरेदी झालेली जमीन रिसॉर्ट पूर्ण झाल्यावर मुंबईतील केबल व्यावसायिकाला विकली. मात्र, केवळ स्टॅम्प ड्युटी भरली गेल्याचे तपासात समोर येताच परब प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले होते.
दरम्यान, परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टसंबंधात (Dapoli Resort) छापेमारी करत ईडीकडून अधिक तपास करण्यात येत आहे. तसेच, जप्त कागदपत्रांतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे गरज पडल्यास ईडीकडून अनिल परब यांची पुन्हा चौकशी (Inquiry) होऊ शकते.
Web Title : ED Raid on Anil Parab | after anil parab other political leaders are also on the radar of ed Directorate of Enforcement
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Food That Delays Pregnancy | नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा..!
Comments are closed.