ED Notice To Avinash Bhosale | प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसलेंच्या अडचणीत भर; आता ED कडून नोटीस

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ED Notice To Avinash Bhosale | येस बँक आणि दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या (Yes Bank – DHFL Scam) माध्यमातून करण्यात आलेल्या गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केलेले बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांना आता विशेष कोर्टाने (Special Court) 8 जून पर्यंत सीबीआय कोठडी (CBI Custody) सुनावली आहे. सीबीआयच्या कचाट्यात सापडलेल्या अविनाश भोसले यांच्या अडचणीत आता आणखी भर पडली आहे. आता पुण्यातील (Pune) मालमत्ता रिकामी करण्याची नोटीस (ED Notice To Avinash Bhosale) सक्तवसुली संचालनालयाने (ED) दिली आहे.
After CBI arrested businessman Avinash Bhosle, ED issued a fresh notice to vacate his property in Pune which was attached by the agency in a money laundering case last year.
Avinash Bhosale has been taken to Delhi by CBI for further investigation.
— ANI (@ANI) June 2, 2022
मागील वर्षी मनी लाँडरिंग प्रकरणात (Money Laundering Case) अविनाश भोसले यांच्याशी संबंधित मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती. मनी लाँडरिंग प्रकरण व्यतिरिक्त ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट (Foreign Exchange Management) कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांची चौकशी केली होती. तसेच, येस बँक- डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी त्यांना सीबीआयने तपासासाठी दिल्लीला नेलं असून ते सध्या सीबीआय कोठडीत आहेत.
कोण आहेत अविनाश भोसले?
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, काँग्रेस नेते विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत. ते पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्याचं पुण्यातील बाणेर परिसरात अलिशान घर आहे. त्याला व्हाईट हाऊस असं नाव देण्यात आलं आहे.
Web Title :- ED Notice To Avinash Bhosale | ED issue notice to pune based builder avinash bhosale pune vacate the property in pune after cbi arrest
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Pune Crime | सिंहगड घाट रस्त्यावर झाडाला गळफास घेऊन प्रौढाची आत्महत्या, प्रचंड खळबळ
Maharashtra Monsoon Update | आगामी 2 दिवसांत मोसमी पाऊस कोकणात; ‘या’ दिवशी मुंबईत बरसणार – IMD
Comments are closed.