ED चे वरिष्ठ अधिकारी देखील लवकरच भाजपचं ‘कमळ’ हाती घेणार?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ED । सक्तवसुली संचालनालयाचे (Directorate of Enforcement) वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह (Rajeshwar Singh) आता लवकरच भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश करणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. ED चे वरिष्ठ अधिकारी असणारे IPS राजेश्वर सिंह हे भाजपच्या प्रमुख नेत्यांशी वारंवार चर्चा करत असल्याची माहिती समोर आलीय. असं मीडिया अहवालानुसार कळतं आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आभा सिंह (Abha Singh) यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे की, ‘देशसेवा करण्यासाठी अकाली निवृत्ती घेतल्याबद्दल ED मधील माझे भाऊ राजेश्वर यांचे खूप खूप अभिनंदन. देशाला तुमची गरज आहे. असं आभा सिंह यांनी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, राजेश्वर सिंह (IPS Rajeshwar Singh) त्यांच्या कार्यकाळामध्ये एअरसेल-मॅक्सिस, 2 G स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा आणि अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर (Augusta Westland Helicopter) घोटाळ्यासारख्या अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास झाला, दरम्यान, राजेश्वर सिंह (IPS Rajeshwar Singh) यांनी भ्रष्टाचार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम यांच्याविरोधात तपास आणि कारवाईमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती.
https://twitter.com/abhasinghlawyer/status/1428672028723318785?ref_src
युपीतील (UP) सुल्तानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांच्याकडे कायद्याची आणि मानवाधिकारांची पदवी आहे. 2018 साली राजेश्वर यांच्याविरोधात चौकशी करण्यात आली. मात्र, आजतागायत कोणत्याही अधिकाऱ्याला त्यांच्याविरूद्ध चुकीचे काम केल्याचे पुरावे आढळून आले नाहीत. दरम्यान, राजेश्वर सिंह सध्या लखनौमध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. 2009 साली ते यूपीतून प्रतिनियुक्तीवर ED मध्ये सामील झाले. परंतु येत्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) मैदानात उतरणार का? हे अद्याप अस्पष्ट आहे.
Web Title : ED | Directorate of Enforcement Senior officer Rajeshwar Singh may be join bjp
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Parambir Singh | सचिन वाझेच्या ‘कोड’चा हॉटेल मालकाने केला उलगडा; ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंग
Comments are closed.