बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. असे असतानाच इबोलाचा शोध लावणा-या एका डॉक्टराने आणखी एक महामारी येणार असून ती कोरोनापेक्षा भयंकर असेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. प्रोफेसर जीन-जॅक्स मुयेम्बे यांनी कोरोना साखरीच एक महामारी मोठ्या गतीने पसरत असल्याचा दावा केला आहे. या महामारीला Disease X नाव दिले आहे. आफ्रिकेच्या घनदाट वर्षा वनांमध्ये कोरोनापेक्षा घातक विषाणू निर्माण होण्याचा धोका निर्माण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
प्रोफेसर जीन यांनी अमेरिकन टीव्ही चॅनल सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, सध्या आपण अशा जगात राहत आहोत की, ज्या ठिकाणी नवे विषाणू निर्माण होत राहतील आणि हे विषाणू मानव जातीसाठी अतिशय धोकादायक राहणार आहेत. भविष्यात येणारी महामारी कोरोना विषाणूपेक्षा अधिक भयंकर असेल आणि त्यामुळे अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. कांगोच्या एका महिलेला विचित्र आजार झाला आहे. महिलेची इबोला चाचणी केली, पण ती निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांना भीती आहे की, महिला Disease X ची पहिली रुग्ण आहे. प्रोफेसर जीन यांनीच पहिल्यांदा रहस्यमय विषाणूच्या पीडितेचा ब्लड सॅम्पल घेतला होता, त्यानंतर त्याला इबोला असे नाव दिल होते. इबोला झाल्यानंतर पहिल्यांदा रक्त येऊ लागते, त्यानंतर रुग्णाचा मृत्यू होतो. जीन यांनी रक्ताचे नमुने बेल्जियम आणि अमेरिकेत पाठवले होते. त्यात एक वर्मच्या आकाराचा विषाणू सापडला होता.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्राण्यांचा रहिवास नष्ट केला जात आहे, तसेच वन्य प्राण्यांच्या व्यापार वाढला आहे. त्यामुळे प्राण्यांमधून विषाणूचा प्रसार वाढला आहे. सार्स, मर्स आणि कोरोना विषाणूही प्राण्यांपासून माणसामध्ये आला होता. ब्रिटनच्या एडिनबर्ग विश्वविद्यालयाच्या शोधानुसार, दर तीन ते चार वर्षांच्या अंतराने जगात एक नवा विषाणू येत असतो. अधिकतर विषाणू प्राण्यामधून माणसामध्ये येतात. जंगली प्राण्यांना मारण्यात आले किंवा त्यांचा खाण्यात समावेश वाढवण्यात आला तर इबोला आणि कोरोनासारख्या महामारी वाढत राहणार आहेत. विशेष करुन जिवंत प्राण्यांचे मास टिकवून ठेवल्याने धोका वाढतो.