नगर : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. या मतदार संघातून डॉ. सुजय विखे यांनी विजय मिळवून राष्ट्रवादी काँग्रसेच्या उमेदवाराला असमान दाखवले होते. मात्र आता सुजय विखे यांची खासदारकी अडचणीत आली आहे. निवडणुक खर्च साजर न केल्याने त्यांना निवडणुक आयोगाचे निरीक्षक अजित मिश्रा यांनी २२ जून पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. जर त्यांनी २२ पर्यंत खर्च साजर केला नाही तर त्यांची निवड अपात्र ठरविण्यात येईल. असे निवडणुक आयोगाने कळवले आहे.
खासदरा सुजय विखे यांच्यासोबत शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना देखील २२ जूनपर्यंत आपला निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा, लागणमार आहे. अन्यथा त्यांना देखील अपात्र ठरविण्यात येईल. नगर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी लोकसभेचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक खर्चाबाबत बैठक घेतली. यावेळी मिश्रा यांनी ही सुचना केली.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, नोड्ल अधिकारी अनारसे, महेश घोडके यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिश्रा यांनी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे भाग १ ते ४ अनुक्रमी १ ते १० शपथपत्र व इतर खर्चाबाबत सुचना केला. या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर ३० दिवसाच्या आत उर्वरित खर्च निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च सादर न केल्यास उमेदवाराला पुढील निवडणूक प्रक्रीयेत सहभाग घेता येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. तर विजयी उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.