बहुजननामा ऑनलाईन – प्रशासनाने पुन्हा एकदा रामपूरचे समाजवादी पार्टीचे खासदार आजम खान यांच्या युनिवर्सिटीवर छापा टाकला आहे. तर आता त्यांचा मुलगा आमदार अब्दुल्लाह आजम खान यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अब्दुल्लाह यांनी पासपोर्टमध्ये खोटी माहिती दिल्यामुळे त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर याच आठवड्यात मंगळवारी प्रशासनाने युनिवर्सिटीवर छापा मारला आहे. या दरम्यान मदरसा आलीयतून चोरण्यात आलेली पुस्तके जौहर अली युनिवर्सिटीच्या ग्रंथालयातून ताब्यात घेण्यात आले होते.
आजम खान द्वारे स्थापित मोहम्मद अली जौहर विश्वविद्यालयावर पोलिसांनी छापा मारून मदरसा आलीय मधून चोरीला गेलेली पुस्तके ताब्यात घेतली आहे. विश्वविद्यालयाचे आजम हे प्रमुख ट्रस्टी आहेत. सेंट्रल लायब्ररीची तपासणी करण्यासाठी पोलिसांची एक टीम १० गाड्यामध्ये मौलाना जौहर येथे दाखल झाली होती. तेथून पोलिसांनी काही पुस्तके ताब्यात घेतली. यादरम्यान कर्मचाऱ्यांनी विरोध केल्याने त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. मदरसा आलियाच्या लायब्ररीमधून पुस्तके चोरी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
याशिवाय खासदार आजम खान यांच्या हमसफर रिसॉर्टवर रामपूर जिल्हा प्रशासन बुलडोजर चालवण्याच्या तयारीत आहे. यासाठी त्यांना नोटीसही जाहीर करण्यात आले. यात सांगण्यात आले की त्यांनी सिंचन विभागाचा एक हजार यार्डवर अवैधपणे ताब्यात घेतले आहे. आजम खान यांच्या भोवती जिल्हा प्रशासनाने फास आवळले आहे. पाच दिवसाआधीच जौहर युनिव्हर्सिटीचे गेट तोडण्याचे आदेश देण्यात आले होते आणि आता आजम यांच्या हमसफर रिसॉर्टवर देखील प्रशासनाने कारवाईचा बडगा उभारला आहे. आजम खान यांच्यावर पहिल्यांदाच अजिमनगर ठाण्यात जमीन ताब्यात घेण्यावरून २७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.