नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रत्येकाचं स्वप्न असत मोठ्या प्रमाणात पैसे money कमावून लखपती होण्याच आता ती संधी चालून आली आहे.
कोलकाता बेस्ड स्टिल मॅन्युफक्चरिंग कंपनी श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड हि कंपनी अशी संधी याच महिन्यात १४ ते १६ जूनपर्यंत घेऊन आली आहे.
ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येत आहे.
याच्या माध्यमातून आपण चांगली कमाई money करू शकाल. जाऊन घेऊ कशा प्रकारे गुंतवणूक करायची.
कंपनीचा आयपीओ १४ जूनला लाँच होणार असून याच्या माध्यमातून ११०७ कोटी रुपये जमवण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
आपण १४ ते १६ तारखेपर्यंत यात पैसा money लावू शकता. तसेच, अँकर गुंतवणूकदारांसाठी ११ जूनला बोली खुली होईल.
मनी money कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीचे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सेबीकडे असून त्यानुसार पब्लिक इश्यूसाठी कंपनी ६५७ कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करेल.
तर प्रमोटर आणि सध्याचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल च्या माध्यमाने ४५० कोटी रुपयांचे शेअर्स जारी करतील.
कंपनी आपल्या आणि सहकारी कंपनी एसएसपीएल वरील कर्ज फेडण्यासाठी आयपीओच्या माध्यमातून जमवलेल्या ६५७ कोटी रुपयांचा वापर करणार आहे.
या आयपीओसाठी श्याम मेट्यालिक्सने ने आयसीआयसीआय सिक्युरिटी, ॲक्सिस कॅपिटल, आयाआयएफएल सिक्युरिटी, जेएम फायनांशिअल आणि एसबीआय कॅपिटलला आपले लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे.
कसा आहे कंपनीचा व्यवसाय
कंपनीचे एकूण तीन कारखाने आहे. ओडिशामधील संबलपूर आणि पश्चिम बंगालमधील जमुरिया आणि मंगलपूर येथे प्रत्येकी एक कारखाना आहे.
कंपनीने ४२ वितरकांनी टीम तयार केली असून ती १३ राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात कार्यरत राहणार आहे.
कंपनीच्या नफ्याबाबत बोलायचे झाल्यास २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचा एकूण महसूल ३९३३.०८ कोटी रुपये होता.
गत वर्षी याच कालावधीत कंपनीचा एकूण महसूल ३२८३.०९ कोटी रुपये होता.
श्याम मेट्यालिकला डिसेंबर तिमाहीत ४५६.३२ कोटींचा निव्वळ नफा झाला असून गेल्या आर्धिक वर्षात क्यू ३ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा केवळ २६०.३६ कोटी रुपये इतका होता.
कृपया हे देखील वाचा:
‘राज्यात शिक्षकांची जिल्हा अंतर्गत अन् आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरु करणार’
मेट्रोमोनियल वेबसाईटवरून त्यानं तब्बल 15 युवतींना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढलं, अन्…
दारु पिण्याच्या कारणावरुन तरुणाचा खुन करुन मृतदेह टाकला इंद्रायणी नदीत