पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात जिल्हा व राज्यांतर्गत प्रवासाला बंदी घातली आहे. तसेच अत्यावश्यक कारणासाठी प्रवास करण्याची गरज असणाऱ्या नागरीकांसाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यात शहरात पोलिस आयुक्तालयात पास देण्याची सुविधा दिली आहे.
त्यानुसार पोलीस आयुक्तालयात गेल्या 17 दिवसात तब्बल 1 लाखांहून अधिक पुणेकरांनी ई पाससाठी अर्ज केला आहे. त्यातील केवळ 27 हजार 592 जणांचे पास मंजूर केले आहेत. निम्म्याहून अधिक अर्ज नाकारले आहेत. याबाबत अनेक तक्रारी आल्याने नाकारलेल्या अथवा प्रलंबित असलेल्या ई पासचे पुनरावलोकन करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.
Getting a lot of Questions on E-Pass. Let's address this.
If you had applied for an E-Pass that shows 'Pending' or 'Rejected' status, you may COMMENT UNDER THIS TWEET with the details & BRING TO MY NOTICE.
I ensure that we will review the application. #EPass #CitizenFirst pic.twitter.com/jwBvTD1JdS
— CP Pune City (@CPPuneCity) May 11, 2021
पोलीस आयुक्त गुप्ता यांनी याबाबत एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ई पासबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. जर आपण ई- पाससाठी अर्ज केला असेल. ज्यामध्ये प्रलंबित किंवा नाकारले स्थिती दर्शविली गेली असेल. तर आपण या ट्विटर अंतर्गत तपशीलांसह माहिती माझ्या लक्षात आणून द्या. आम्ही त्या अर्जाचे पुनरावलोकन करणार आहोत. अनेकवेळा काही किरकोळ चुका तसेच अत्यंत महत्वाचे काम असतानाही केवळ कोरोना चाचणी न जोडल्याने अर्ज फेटाळले आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त अर्ज फेटाळले गेले आहेत. अनेकांनी याबाबत तक्रारी केल्याने अर्जांचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी म्हटले आहे.