डूंगरपुर : वृत्तसंस्था – राजस्थानच्या डूंगरपुरमध्ये पोलिसांनी गुजरातला निघालेल्या एका कारमधून अनेक कोटी रुपये जप्त केले आहेत. जिल्ह्याच्या बिछीवाडा पोलिसांनी शनिवारी नॅशनल हायवे 8 वर मोठी कारवाई करत 4.5 कोटी रुपये कॅश जप्त केली आहे. हवालाच्या काळ्या कमाईसोबत दोन आरोपींना सुद्धा अटक केली आहे.
दोन आरोपी हे कोट्यवधी रुपये दिल्लीहून गुजरात घेऊन चालले होते. सध्या पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. सोबतच दावा केला जात आहे की, हे पैसे हवालाचे आहेत.
डिएसपी मनोज सवारियां यांनी सांगितले की, सध्या पैसे जप्त करण्यात आले आहेत आणि आरोपींची चौकशी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे हवालाचे प्रकरण वाटत आहे. मात्र, पोलीस सध्या घटनास्थळी कारवाई करत आहेत. आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
बँकांकडून मागवल्या मशीन
पोलीस ठाण्यात इतक्या नोटा मोजणे शक्य नसल्याने बँकांकडून मशीन आणाव्या लागल्या. नोटा मोजण्यातच सकाळपासून संध्याकाळी झाली. ज्या डीएल8 सीएएक्स 3573 क्रमांकाच्या कारमधून हे पैसे जप्त करण्यात आले ती गाडी जप्त करण्यात आली आहे. ज्या महामार्गावर ही रोखड पकड्यात आली त्या मार्गावरून नेहमीच तस्करी आणि दोन नंबरच्या काळाबाजाराच्या मालाची वाहतुक सुरू असते.