पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सकाळ व दुपार सत्रात असणारी सर्व दुय्यम कार्यालये नियमित म्हणजेच सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती पुणे शहर मुद्रांक जिल्हाधिकारी गोपीनाथ कोळेकर यांनी दिली.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे वतीने नागरिकांच्या सुरक्षिततच्या दृष्टीने व दस्त नोंदीच्या सोईसाठी परिपत्रक काढून सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. परिपत्रकात पीडिए द्वारे करणे अनिवार्य करण्यात आलेले असून दुय्यम निबंधक कार्यालयातील डेटा एन्ट्री किंवा दुरुस्त्या पूर्णपणे थांबविण्यात आलेल्या आहेत.
केवळ ऑनलाईन आगाऊ बुकिंग करूनच दस्त नोंदणी केली जाईल, नोंदणी विभागाच्या वेबसाईटवर लिव्ह अँड लायसन्सचा पर्याय असल्याने कार्यालयातील फिजिकल रजिस्ट्रेशन थांबविणेत आलेले आहे, नोटीस ऑफ इंटिमिशनचे फिजिकल फायलिंग थांबवण्यात आलेले आहे, मूल्याकंन अहवाल, अर्ज करणे व फी भरणे थांबविण्यात आलेले आहे आदी बाबीचा उल्लेख या परिपत्रकात असल्याची माहिती कोळेकर यांनी दिली.