नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डीएसपी अतुल सोनी यांनी आपल्या पत्नीवर गोळी चालवल्याच्या प्रकरणाला आता नवेच वळण आले असून पत्नीने सोमवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला एक प्रतिज्ञापत्र पाठवले. त्यात त्यांनी फायरिंगच्या कथेला खोटे असल्याचे सांगितले असून एचआयआरमध्ये पोलिसांनी खोटी कहाणी रचली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर एकीकडे त्यांनी फायरिंगसाठी जी पिस्तूल वापरली होती ती अवैध होती. तसेच या घटनेत एक गोळीही चालवली गेली ज्याची पुंगळी जप्त करण्यात आली आहे.
पोलीस प्रकरणाचा तपास करत असल्याचे एसएसपी कुलदीप सिंह यांनी सांगितले. डीएसपी अतुल सोनी यांची पत्नी सुनीता सोनी यांनी सोमवारी प्रतिज्ञापत्राची प्रत मोहालीच्या एसएसपी कुलदीप सिंह चहल आणि डीएसपी रमनदीप सिंह यांच्याकडे पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. तसेच त्यांच्या वकिलांनी देखील प्रतिज्ञापत्राची एक प्रत पोलीस स्टेशनला जाऊन जमा केली असल्याचा दावा केला आहे.
त्या प्रतिज्ञापत्रात जेव्हा प्रकरणाची एफआयआर पाहिली तेव्हा कळले की त्यात गोळी चालवण्यात आल्याचा उल्लेख होता, असे सुनीता सोनी सांगितले. तसेच जेव्हा त्यांचा आणि अतुल सोनी यांचा वाद झाला तेव्हा त्यांच्या मुलीने पोलिसांना फोन करून बोलावून घेऊन घरात हिंसा झाल्याचे सांगितले गेले. ही तक्रार त्यांनी किंवा त्यांचं मुलीने लिहिली किंवा वाचली नव्हती. गोळी चालवण्याची कहाणी पोलिसांनीच रचली आहे.