पुणे : बहुजननामा ऑनलाइन – बांधकाम व्यावसायिक डीएसकेच्या गुंतवणूकदाराने गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे गुंतवणूकदारामध्ये खळबळ उडाली आहे. तानाजी गणपत कोरके (वय ६१, रा. भीमनगर, आंबेडकर हायस्कुलसमोर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पुण्यासह विविध शहरातील नागरिकांनी डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. यात बहुतास जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. डीएसके त्यांची पत्नी यांच्यासह 11 जण सध्या अटकेत आहेत. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे. डीएसके यांच्या कोट्यवधी रुपयांची जमीनी पोलिसांनी जप्त केल्या असून, आता त्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मात्र, यात पैसे गुंतवणूक केलेल्या अनेकांची तारांबळ सुरू आहे. त्यांना अद्याप ही पैसे मिळत नसल्याने अनेक जण नैराश्यात आहेत. मात्र, न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने गुंतवणूकदार यांना काहीच मिळालेले नाही. या नैराश्यातुनच कोरके यांनी शुक्रवारी पहाटे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.
Visit : bahujannama.com